मराठी एकीकरण समितीमध्ये फूट; कार्याध्यक्ष सह चौघांना काढले! सारख्याच नाव व बोधचिन्हाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:15 IST2025-11-18T18:14:22+5:302025-11-18T18:15:31+5:30
मराठी एकीकरण समितीचाच्या कार्यपद्धती, नियमावली आणि कार्यकारिणीची संमती न घेता स्वतंत्ररित्या सारख्याच नावाने वेगळी संस्था सुरू केली व सारखाच वाटेल असे बोधचिन्ह वापरून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याने शिस्तभंगाची कारवाई करत चौघांना काढून टाकले.

मराठी एकीकरण समितीमध्ये फूट; कार्याध्यक्ष सह चौघांना काढले! सारख्याच नाव व बोधचिन्हाचा वापर
मराठी एकीकरण समितीचाच्या कार्यपद्धती, नियमावली आणि कार्यकारिणीची संमती न घेता स्वतंत्ररित्या सारख्याच नावाने वेगळी संस्था सुरू केली व सारखाच वाटेल असे बोधचिन्ह वापरून समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याने शिस्तभंगाची कारवाई करत चौघांना काढून टाकले असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली आहे.
कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, रवींद्र भोसले, मारुती भट्टगिरी, सिद्धेश पाटील ह्यांनी “मराठी एकीकरण समिती – एक लोकचळवळ” या नावाने ऑक्टोबर २०२५ मध्ये स्वतंत्रपणे नोंदणी करून कार्य करण्यास सुरुवात केली असून, आमच्या संघटनेच्या नाव व बोधचिन्हाशी साम्य असलेले चिन्ह वापरत आहे. त्यांची मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य या मूळ संघटनेतून अधिकृत हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे असलेली कार्याध्यक्ष व इतर सर्व पदे तात्काळ रद्द करण्यात आलेली आहेत. याबाबतची सर्व लेखी नोटिसा पूर्वीच देण्यात आल्या आहेत. तरीही काही व्यक्ती समाज माध्यमावर मराठी एकीकरण समितीचे नाव वापरून दिशाभूल करत आहेत.
समाजातील सर्व मराठी बांधवांना विनंती आहे की अशा गैरअधिकृत माहिती बद्दल सावध रहावे. सदर व्यक्तींमार्फत होणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय, आर्थिक किंवा इतर प्रकारच्या कृतींसाठी मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य अथवा अधिकृत पदाधिकारी जबाबदार राहणार नाहीत.
आमच्या समितीतील सर्व पूर्वीचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य सक्रीयपणे आमच्यासोबत आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मराठी हितासाठी, मराठी शाळा, उद्योग, रोजगार, भाषा संवर्धन व मराठी समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही एकजुटीने कार्य करत राहू असे देशमुख यांनी म्हटले आहे.
'जुनी संस्था केवळ चार सदस्य पैकी, तीन लोकांच्या हाती बंदिस्त आहे. आठ वर्षात एकही अधिक सभासद नोंद नाही. आठ वर्षात लेखा, लेखापरीक्षण केले नाही, सभासद यादी शासन दरबारीं नोंद नाही. आर्थिक गैरफायदा घेत आहेत.
एकाधिकारशाही सुरू आहे. जे विचारणा करतील त्यांच्या विरोधात खोट्या कथा रचून सदस्यांना बाहेर काढले जाते. सामाजिक बदनामी केली जाते. फोटो विद्रुप करून, सामाजिक माध्यमावर टाकून चिखल्फेक केली जाते. अनेक शिलेदार चळवळीतून बाहेर पडले, काढले गेल, थंड झाले. मराठी चळवळीचे नुकसान नको म्हणून मी गप्प आहे', - प्रदीप सामंत ( मा. कार्याध्यक्ष, मराठी एकीकरण समिती)