उल्हासनगरातील वाहतूक समस्या निकाली काढा, महापालिकेत पोलीस विभागा सोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:00 IST2022-05-17T20:53:58+5:302022-05-17T21:00:50+5:30
उल्हासनगरात वाहतूक समस्या ऐरणीवर आली असून ती सोडविण्यासाठी महापालिका स्थायी समिती सभागृहात मंगळवारी दुपारी बैठक झाली.

उल्हासनगरातील वाहतूक समस्या निकाली काढा, महापालिकेत पोलीस विभागा सोबत बैठक
उल्हासनगर: शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका स्थायी समिती सभागृहात आमदार कुमार आयलानी यांच्यासह शहर वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी, परिवहन समितीचे सभापती, उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका राजपूत आदीजन उपस्थित होते. यावेळी आमदार आयलानी यांनी शहरातील अवैध वाहने, रिक्षा स्टॅण्ड आदी बाबत माहिती दिली.
उल्हासनगरात वाहतूक समस्या ऐरणीवर आली असून ती सोडविण्यासाठी महापालिका स्थायी समिती सभागृहात मंगळवारी दुपारी बैठक झाली. यावेळी शहरातील वाहतूक कोंडीवर चर्चा होऊन अवैध वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आमदार कुमार आयलानी यांनी केली. तसेच अवैध रिक्षा स्टँडमुळे वाहतुकीस अडथडे निर्माण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी बैठकीला आमदार कुमार आयलानी, परिवहन समिती सभापती सुभाष तनावडे, उल्हासनगर महापालिका अशोक नाईकवाडे, प्रियांका राजपूत, सहायक आयुक्त गणेश शुंपी, वाहतूक विभागाचे अधिकारी डॉ बालराम कुमावत तसेच परिवहन समितीचे सदस्य उपस्थित होते.