शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

"...मग शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांसोबत बसताना तुम्हाला काहीच वाटत नाही का?" सुभाष साबणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 11:10 IST

Subhash Sabane, Uddhav Thackeray: भाजपासोबत पुन्हा युती करण्याची शिंदे गटाची मागणी फेटाळून लावताना उद्धव ठाकरे यांनी  माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू असा सवाल केला होता, त्याला आता शिवसेनेचे माजी आमदार आणि आताचे भाजपा नेते सुभाष साबणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाणे - गेल्या आठवड्यात शिवसेनेत झालेल्या बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० हून अधिक सेना आमदार बंड करून गुवाहाटीमध्ये एकवटले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत ही बंडाळी मोडून काढण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान, भाजपासोबत पुन्हा युती करण्याची शिंदे गटाची मागणी फेटाळून लावताना उद्धव ठाकरे यांनी  माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू असा सवाल केला होता, त्याला आता शिवसेनेचे माजी आमदार आणि आताचे भाजपा नेते सुभाष साबणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यात आलेलेल सुभाषण साबणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात बोलणाऱ्या किरीट सोमया यांच्या मांडीला मांडी लावून मी कसं बसू? पण  उद्धव ठाकरेजी शिवसेनाप्रमुखाना अटक करून नेणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना, त्यांना घरी जेवायला बोलावताना आपल्याला काहीच वाटत नाही का? असा सवाल सुभाष साबणे यांनी विचारला आहे. छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्यावर विधानसभेत याविरोधात जाब विचारल्याबद्दल सुभाष साबणे यांनी वर्षभर निलंबनाची कारवाई झेलली होती. 

सुभाष साबणे पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक आघाडी करून आधी यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांच्या मेव्हण्याला उमेदवारी देऊन त्यांचा पराभव करण्यात आला.  त्यानंतर पंढरपूरची पोटनिवडणुक लागली तेव्हा त्यातही शिवसेनेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा तेच करण्यात आलं आणि अलीकडे कोल्हापूर पोटनिवडणुकीत राजेश श्रीरसागर यांच्यासारखा कार्यकर्ता असतानाही ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली.

दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हे बंड नसून शिवसेनेच्या भल्यासाठी दिलेला लढा आहे.  त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला जाहीर समर्थन द्यावं,  असं आवाहनही सुभाष साबणे यांनी यावेळी केलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण