शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका बसविणार स्मार्ट मीटर

By admin | Updated: October 15, 2015 01:45 IST

गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले नळजोडणीवरील मीटर बसविण्याचा प्रस्ताव आता पुन्हा नव्याने पटलावर आला आहे.

ठाणे : गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले नळजोडणीवरील मीटर बसविण्याचा प्रस्ताव आता पुन्हा नव्याने पटलावर आला आहे. पूर्वीची हायटेक योजना अतिखर्चीक असल्याने अखेर ती कागदावरच ठेवून पालिकेने आता कमी खर्चाची नवी स्मार्ट मीटर योजना पुढे आणली आहे. ती पीपीपी म्हणजे खाजगी लोकसहभागातून राबविली जाणार असून याअंतर्गत आॅन दी स्पॉट रीडिंग घेतानाच त्याच वेळेस ग्राहकाला रीडिंगनुसार पाण्याचे बिल अदा करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि प्रभाग समितीपर्यंत जाण्याचा खर्चही वाचणार आहे. पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने मीटर बसविण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपूर्वी घेतला होता. आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही स्मार्ट मीटर योजना पुढे आणली आहे. ती खाजगी लोकसहभागातून राबविली जाणार असून सात वर्षांसाठी खाजगी संस्थेला हे काम दिले जाणार आहे. या संस्थेनेच रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी नेमायचे असून मीटर बसविण्यापासून त्यांची निगा, देखभाल आदी कामेही त्यांनाच करावी लागतील. तसेच, मीटर खराब झाले तरी ते बदलण्याची जबाबदारीदेखील संबंधित संस्थेची असणार आहे. पूर्वीच्या योजनेप्रमाणे बिलांचे प्रिटिंग, वाटप, रीडिंग याची जबाबदारी त्याचीच असेल.तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. दरम्यान, त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी या योजनेचा गाशा गुंडाळला. मुंबईत एमआरए पद्धतीचे मीटर बसविण्यासाठी अधिक पैसे खर्च झाले होते. परंतु, बसविलेले मीटर फारसे यशस्वी ठरले नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेचा हा अनुभव गाठीशी बांधून त्यांनी ही योजनाच बंद केली.पाणी गळती थांबविणे महापालिकेला शक्य होणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून शहरातील जलकुंभांतील दररोजच्या जलसाठ्याची माहिती होणार आहे. हे काम किमान सात वर्षांसाठी दिले जाणार आहे.