शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कौशल्यविकास केंद्राने थकविले पावणेदोन कोटी, बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:21 AM

गावदेवी मंडईमधील दुसऱ्या मजल्यावरील जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या कौशल विकास केंद्राला देण्यात आली आहे.

ठाणे : गावदेवी मंडईमधील दुसऱ्या मजल्यावरील जागा जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केलेल्या कौशल विकास केंद्राला देण्यात आली आहे. या केंद्राकडून पालिकेला वार्षिक ५८ लाखांचे भाडे अपेक्षित आहे. परंत, सुमारे अडीच वर्षे उलटूनही या केंद्रामार्फत साधा करारनामाही केला नसून पालिकेचे पावणेदोन कोटीहून अधिक भाडेसुद्धा थकविल्याचे उघड झाले आहे. त्यातही २०१८ मध्ये पालिकेने संबंधित केंद्राकडे भाडे वसुलीबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु, तहसीलदार कार्यालयानेच पालिकेच्या उपायुक्ताला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे तेंव्हापासून पालिकेनेही भाडे वसुलीचा नाद सोडून दिला आहे. परंतु, एखाद्याने साधा मालमत्ताकर थकविला तर त्याची मालमत्ता जप्त करणाºया महापालिकेने या केंद्रावर एवढी मेहरनजर दाखविल्याने संताप व्यक्त होत आहे.ठाणे महापालिकेने २० आॅक्टोबर २०१६ रोजी महासभेत प्रस्ताव सादर करून गावदेवी भाजी मंडईतील दुसºया मजल्यावरील ९२९.०३ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा ही केंद्राकडून सुरू करण्यात येत असलेल्या कौशल्य विकास केंद्रासाठी दिली जाईल. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांना ती देत असतांना भाडेतत्वावर देण्याचेही निश्चित केले होते. त्यानुसार वार्षिक ५८ लाख ३५ हजार २३७ रुपयांचे भाडे आकारले जाणार होते. तसेच प्रत्येक वर्षी या भाड्यात १० टक्के वाढ अभिप्रेत होती. त्यानुसार पुढील पाच वर्षांसाठी ही जागा देण्याचे निश्चित झाले. परंतु, हा ठराव झाल्यावर जागेचा ताबा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा वार्षिक १ रुपया नामात्र भाडेतत्त्वावर मिळावी, असे पत्र पालिकेला दिले होते. परंतु, या काळात संबधींत यंत्रणेने पालिकेकडे अनामत रक्कम किंवा भाडेकरारनामासुद्धा करून घेतला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आल्यानंतर पालिका प्रशासनाने पुन्हा आधीच्या प्रस्तावात बदल करून १ रुपया नाममात्र दराने भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव सप्टेंबर २०१८ च्या महासभेत ठेवला होता. परंतु, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हा प्रस्ताव फेटाळून संबधींत केंद्राकडून भाडेवसुली करावी असा ठराव केला.दरम्यान पालिका उपायुक्तांनी संबंधित यंत्रणेकडे थकबाकीसाठी पत्रव्यवहार केला असता, पालिकेला भाडे तर मिळाले नाहीच. परंतु, ज्या उपायुक्ताने पत्र दिले होते, त्यालाच उलट तहसीलदार कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली. यामध्ये आपण जागेचा चुकीचा वापर केला असून त्याठिकाणी पार्किंगआणि इतर व्यावसायिकांनीही व्यवसाय करण्याची संधी दिल्याचा ठपका ठेवला. त्याला पालिकेने उत्तर दिले होते.गावदेवी भाजीमंडईची जागा ही पूर्वी शासनाची होती. त्यानुसार पालिकेने रक्कम भरून ती जागा आपल्या नावावर केली आहे. परंतु, ती ताब्यात घेतल्यानंतर त्यावर जिल्हाधिकाºचाही काही प्रमाणात हक्क असल्याचे बोलले जात आहे. त्याच अनुषगांने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दबाव येत आहे.जास्तीच्या जागेचा वापरसंबंधित कौशल्य विकास केंद्राला पालिकेकडून साडेनऊ हजार चौरस फुट जागा वापरण्यासाठी दिली गेली आहे. परंतु, असे असतांना केंद्राकडून या ठिकाणी १२५०० चौरस फुट जागेचा वापर केला जात असल्याचा ठपकाही आता पालिकेने ठेवला आहे. त्यानुसार सुमारे ३ हजार चौरस फुट अनाधिकृत वापरही या केंद्राकडून सुरू असल्याची बाब समोर आली आहे. यामुळेच तेरी भी चुप मेरी भी चुप म्हणत दोनही विभाग शांत बसले आहेत. त्यामुळे ही वसुली करणार कोण असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणे