शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेवर मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 3:25 PM

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ हटविण्याची मागणी केली. 

कल्याण- आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढत डम्पिंग ग्राऊंड तात्काळ हटविण्याची मागणी केली. डम्पिंग ग्राऊंड हटाव संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात माजी आमदार प्रकाश भोईर, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रविंद्र कपोते, देवानंद भोईर, कांचन कुलकर्णी, प्रिया शर्मा, मनिषा डोईफोडे, निशा करमरकर, पत्रकार विशाल वैद्य आदी विविध सोसायटींचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शिष्टमंडळाने नवनियुक्त आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. आयुक्त बोडके यांनी माझा पहिलाच दिवस आहे. मात्र या समस्येविषयी सखोल माहिती घेऊन येत्या बुधवारी डम्पिंगची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिलं आहे. नागरिकांना डम्पिंगचा त्रास होतो. तो दूर करण्यासाठी तातडीने कोणती उपाययोजना करायची याला प्राधान्य दिले जाईल. नागरीकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यावर माझा भर अधिक राहणार आहे. शिष्टमंडळाने सांगितले की, डम्पिंगची आग विझविण्यासाठी 50 पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याचे टँकर वापरले. त्यामुळे हाजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झालेली आहे. डम्पिंगचा वास अतिशय उग्र असल्याने कल्याण स्टेशनपर्यंत वास येतो. केवळ परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत नाही. तर वाऱ्याने हा वास टिटवाळा, डोंबिवली ठाकुर्लीपर्यंत पसरतो याकडे नागरीकांनी लक्ष वेधले. डम्पिंग बंद करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिले आहे. न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता महापालिकेस करता येत नसल्यास नागरीकांनी कुठे दाद मागायची असा प्रश्न शिष्ट मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्याचबरोबर धनराज खातमकर आणि आर. डी. शिंदे हे आयुक्त असताना त्यांनी डंपिंगमच्या कच:यातून निघणाऱ्या मिथेन वायूवर उपाययोजना केली होती. त्यानंतर नागरीकांना होणारा त्रस कमी झाला होता. त्यांच्या पश्चात डंपिंगला आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. डंपिंगला आग मिथेन वायूने लागत नसून ती लावली जाते असा आरोप शिष्टमंडळाने केला. टिटवाळा आणि डोंबिवलीचा कचरा आधारवाडी येथे टाकण्यात येऊ नये. शहरात अन्य ठिकाणी डंपिंगची किती आरक्षणो आहेत. ही आरक्षणो का विकसीत केली गेली नाही. प्रशासनातील कोणते अधिकारी त्याला जबाबदार आहे. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई का केली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला गेला.