लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डंपरच्या धडकेत दुचाकीवरील रवींद्र सर्जेराव आटोगडे (२७) आणि विक्रम राजाराम दीपक (३०) या दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले असून डंपर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.ठाणे ते नाशिक राष्टÑीय मार्गावरुन एका मोटारसायकलीवरुन हे दोघेजण जात होते. त्याचवेळी माजीवडा उड्डाण पूलाजवळ नाशिकच्या दिशेने जाणारा एक डंपर भरघाव वेगात त्यांच्यामागून आला. याच डंपरच्या धडकेत दुचाकीवरील हे दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले. मोटारसायकल घसरल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.
धक्कादायक! ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 23:15 IST
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील रवींद्र सर्जेराव आटोगडे (२७) आणि विक्रम राजाराम दीपक (३०) या दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
धक्कादायक! ठाण्यात डंपरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यु
ठळक मुद्दे माजीवडा येथील घटनाडंपरचालक पसार