Shocking! Motorcyclist killed after colliding with a speed bump | धक्कादायक! गतिरोधकावर आदळून मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हात गुन्हा

ठळक मुद्देकापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गतिरोधकावर आदळून जयेश राजेश जाधव (२३, रा.बाळकूम, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना कोलशेत रोडवर रविवारी घडली. याप्रकरणी हयगयीने मोटारसायल चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा जयेश याच्याविरुद्ध सोमवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
बाळकूम येथील रहिवाशी असलेल्या जयेश मोटारसायकल एनजी रिजन्सी कॉलनी पाईपलाइन रोड मार्गे कोलशेत खाडीकडे जाणाऱ्या मार्गाने २५ आॅक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास जात होता. त्याचवेळी कोलेशेत खाडी शेवटच्या वळणावर गती रोधकावरुन त्याची मोटारसायकल घसरुन तो पाईपलाईनलगतच्या सिमेंट कठडयाजवळ मोटारसायकलसह रस्त्यावरुन खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! Motorcyclist killed after colliding with a speed bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.