लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोपरीतील गांधीनगर येथील स्वत:च्या घरात वर्षा ओमप्रकाश वर्मा (२२) या कंपाऊंडर तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.वर्षाचे वडिल नेहमीप्रमाणे मुलुंड येथे फळ विक्रीसाठी गेले होते, तर आई स्वयंपाकात मग्न होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आंघोळ करुन रुममध्ये गेल्यावर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्या वेळानंतर आई तिला जेवायला बोलविण्यासाठी गेली असता, हा प्रकार समोर आला. आई वडिलांना एकूलती एक असलेल्या वर्षाचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. ती कोपरीतच एका क्लिनिकमध्ये कंपाऊंडरचे काम करीत होती. तिचे कोणाशी भांडण नव्हते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिला कोणाचा त्रास होता किंवा कसे, याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.
धक्कादायक! ठाण्याच्या कोपरीमध्ये कंपाऊंडर तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 02:18 IST
एकीकडे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु असतांनाच कोपरीतील एका कंपाऊंडर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. तिने आत्महत्या नेमकी कशामुळे केली, याचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
धक्कादायक! ठाण्याच्या कोपरीमध्ये कंपाऊंडर तरुणीची आत्महत्या
ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्हाआत्महत्येचे कारण अस्पष्ट