शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वाढीव वीजबिलाचा सुमारे पाच लाख ग्राहकांना शॉक

By admin | Updated: December 8, 2015 00:50 IST

आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडल्याने तो हैराण झाला असतांनाच महावितरणने या सर्वसामान्य सुमारे पाच लाख ग्राहकांना अचानक २० टक्के वाढीव बिलाचा शॉक दिला आहे

अजित मांडके,  ठाणेआधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडल्याने तो हैराण झाला असतांनाच महावितरणने या सर्वसामान्य सुमारे पाच लाख ग्राहकांना अचानक २० टक्के वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. अचनाक बिलात ७०० ते २००० पर्यंतची वाढ कशी झाली असा सवाल आता हे सर्वसामान्य ग्राहक करु लागले आहेत. त्यामुळे हे वाढीव बिल कमी करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणचे दरवाजे ठोठावण्यास सुरवात केली असून त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे.मागील महिन्यात ज्या ग्राहकाला १२०० रुपये बिल येत होते, त्यांना अचानक या महिन्यात २ हजार पर्यंतचे बिल आले आहे. अशीच परिस्थिती व्यवसायीक ग्राहकांची देखील असून त्यांनाही महावितरणचा शॉक बसला आहे. हे बील आॅक्टोबर महिन्यातील असून, आधीच आॅक्टोबर हीटमुळे हैराण झालेल्या आणि वारंवार वीज पुरवठा या महिन्यात खंडीत झाल्यानंतरही सर्वसामान्य ग्राहकांच्या हाती अशा प्रकारे वाढीव बिल आल्याने ते चांगलेच संतापले आहेत. या संदर्भात अनेक ग्राहक महावितरणच्या विविध कार्यालयात खेपा घालत आहेत. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. आधी बिल भरा, अर्ज करा नंतर तुमच्या बिलाचे बघु अशीही उत्तरे ग्राहकांना मिळत आहेत. परंतु अचानक, आलेल्या वाढीव बिलाचे कारण काय? याचेही धड उत्तर त्यांना मिळत नाही. असे वाढले बिल...महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की इंधनात १ रुपयांची, टेरीफमध्ये जून मध्ये बदल करण्यात आले आहेत. परंतु त्याचे परिपत्रक उशिराने हाती पडल्याने, जून महिन्याची थकबाकी आणि टॅक्स आॅन सेल लावला गेल्याने एकूण साधारणपणे काही ग्राहकांना ३२ दिवसांचे बिलकाही ग्राहकांना एक महिन्याचे म्हणजेच ३० ऐवजी ३२ दिवसांचे बील गेले आहे. ठेकेदारकडून रेडींग चुकीच्या दिवशी घेतले गेल्यानेच असा प्रकार घडल्याचे महावितरणचे मत आहे. परंतु पुढील महिन्याच्या बिलात २८ दिवसांचे बील येईल असा दावा महावितरण करीत आहे.