Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शून्य किंमत; शिवसैनिकांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:16 PM2020-03-14T13:16:57+5:302020-03-14T13:25:23+5:30

'कोरोना'ची दहशत असताना ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळ

shivsena workers organises misal mahotsav even after cm uddhav thackeray orders about coronavirus kkg | Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शून्य किंमत; शिवसैनिकांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन

Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शून्य किंमत; शिवसैनिकांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजन

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही शिवसैनिकांकडून मिसळ महोत्सवाचं आयोजनगर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनामुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर

ठाणे: जगभरात 'कोरोना'चे थैमानाचे सुरू असल्याने सरकार आणि प्रशासनाने जास्त गर्दी होऊ यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांसाठी व्यायामशाळा, मॉल, जलतरण तलाव, चित्रपटगृहांवर सरसकट बंदी लागू केली. तर ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनाही  त्यांनी १५ दिवस नागरिक, मतदार किंवा लोकांचा जमाव एकत्र येऊन जमा होतील, अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला. मात्र शिवसैनिकांनी मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्त्वाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. 

मुख्यमंत्र्यांसोबतच ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी खबरदारी म्हणून गर्दी होईल अशा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले. तरीही ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर परिसरातील शिवसैनिक दिशा ग्रुपचे भास्कर बैरीशेट्टी आणि त्यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका असणार्‍या पत्नी रागिणी बैरीशेट्टी यांच्या आशीर्वादाने पोखरण रोड येथील उन्नती गार्डन मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंञी महोदयांचे आदेश डावलून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्याचे शहरभर होर्डिंग लावत दिमाखदार उद्घाटनही झाले असून परिसरात नेहमी सामाजिक कार्य करणार्‍या दिशा ग्रुपच्या बैरीशेट्टी दाम्पत्याकडून तरी 'कोरोना'चे सावट असताना नागरिकांचे जीव धोक्यात घालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अपेक्षा नव्हती.

एकीकडे हिंदू नववर्षाच्या स्वागताचा मानबिंदू असणार्‍या जिल्ह्यातील गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रांवर जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातलेली असताना व सातारा जिल्ह्यातील बावधनच्या पारंपारिक 'बगाड' यात्रेच्या आयोजनानिमित्त संबंधितांवर 'कोरोना' नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुद्द जिल्हाधिकारी कारवाईच्या तयारीत असताना ठाण्यातील अशा मिसळ महोत्सवावर जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- संदीप दिनकर पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
 

Web Title: shivsena workers organises misal mahotsav even after cm uddhav thackeray orders about coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.