शिवसेना नगरसेवकाची मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 19:13 IST2018-07-03T19:13:06+5:302018-07-03T19:13:41+5:30
महात्मा फुले पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

शिवसेना नगरसेवकाची मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला मारहाण
कल्याण - गाडी घेऊन जाण्यास मनाई केल्याचा जाब विचारणाऱ्या मनसे महिला विभाग अध्यक्षाच्या पतीला शिवसेना नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी बासरे यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात नालेसफाईचे काम सुरु होते. यावेळी मनसे विभाग अध्यक्षा माधुरी देवरे यांचे पती बन्सीलाल देवरे हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होते. यावेळी देवरे यांनी आधी दोन गाड्या गेल्या आहेत तर मलाही जाऊद्या असे शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांना सांगितले. यावेळी बासरे यांनी देवरे यांना ओरडत गाडी मागे घेण्यास सांगितले. तर बासरे यांनी आपल्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप देवरे यांनी केला असून, बासरे यांनी मात्र आपण कोणालाही मारहाण केली नसल्याचे सांगितले. याप्रकरणी नगरसेवक सुधीर बासरे यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.