शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीलाही आचारसंहितेचा फटका, शहरात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:56 IST

शिवजयंत्ती उत्सवावर यंदा आचारसंहितेचे सावट घोंगावले आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन हा उत्सव रद्द केला आहे.

ठाणे - शिवजयंत्ती उत्सवावर यंदा आचारसंहितेचे सावट घोंगावले आहे. ठाणे महापालिकेने आचारसंहितेचे कारण देऊन हा उत्सव रद्द केला आहे. या उत्सवात सर्वपक्षीय नेते आणि ठाणेकर सहभागी होत असतात. त्यातून कोणताही निवडणूक प्रचार होत नाही किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्याचेही प्रयत्न होत नाहीत. परंतु, असे असतानाही पालिकेने अचानक अशा प्रकारचे पाऊल उचलण्याने शिवभक्तांत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राजकीय मंडळी आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.ठाणे महापालिकेच्यावतीने २३ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली जाते. मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. मासुंदा तलावापासून निघाणारी ही मिरवणूक बाजारपेठेतून मार्गक्र मण करून गडकरी रंगायतन येथे विसर्जीत केली जाते.शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ठाण्यातील मान्यवर या सोहळ्यात सहभागी होत असतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता असल्याने पालिकेने शिवजयंती साजरी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पालिकेच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्र ीया व्यक्त होत आहेत.आचारसंहिता लागू असताना पालिका वेगवेगळ्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करत आहे. यापूर्वी आचारसंहिता असतानाही काही राजकीय पक्षांच्या नेत्यांमार्फत विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपुजन सोहळेसुद्धा पार पडले होते. मात्र, आता आचारसंहितेच्या नावाखाली परंपरागत शिवजयंती सोहळा रद्द करण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. या सोहळ्यातून कोणताही राजकीय पक्षाचा प्रचार केला जात नाही. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा केल्या जात नाहीत. त्यामुळे आचारसंहितेच्या नावाखाली सोहळा रद्द करणे योग्य नाही. प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाआचारसंहितेच्या काळात राजकीय कार्यक्रमांवर बंदी असते. मात्र, कदाचित राजकारणी मंडळी शिवाजी महाराजांचा उपयोग हा राजकरणासाठी करतात हे कदाचित पालिकेच्या लक्षात आले असावे म्हणूनच अशा पद्धतीने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. परंतु, पालिकेने या निर्णयाचा फेरविचार करावा.- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते-ठामपा)

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका