शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेवर नजर ठेवून खरा ‘आनंद’ शिंदेसेनेला

By मुरलीधर भवार | Updated: May 18, 2026 07:47 IST

दिवंगत प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे  ठाण्यातून चार वेळा खासदार होते. त्यांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी उच्चशिक्षित आनंद यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

-मुरलीधर भवार
प्रतिनिधी

दलत्या राजकीय परिस्थितीत राजकीय सोयीसाठी कोणत्या पक्षात कोण कधी उडी घेईल, हे काही सांगता येत नाही. तेच माजी खासदार आनंद परांजपे यांच्याबाबतीत घडले. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विधानपरिषदेवर वर्णी लागत नाही, हे कळताच परांजपे यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यांची राजकीय दूरदृष्टी भविष्यात सूचित होईलच. दिवंगत प्रकाश परांजपे हे शिवसेनेचे  ठाण्यातून चार वेळा खासदार होते. त्यांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळी उच्चशिक्षित आनंद यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यावेळी ते पत्रपरिषदेत वडिलांच्या आठवणीने रडले होते. आनंद यांनी राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना पराभूत केले. त्यानंतर २०१० मध्ये राष्ट्रवादीचेच वसंत डावखरे यांनाही पराभूत केले.  

शिवसेनेत घुसमट सुरू झाल्यावर आनंद यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले कल्याण, डोंबिवली काबीज करायचे होते. डोंबिवलीत एक ब्राह्मण चेहरा देण्याचा आपला प्रयत्न पवारांनीच फसविला. प्रचारसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘हाफ चड्डीवाले’ असा उल्लेख  करीत टीका केली. त्यामुळे परांजपेंविरोधात मतदान झाले व श्रीकांत शिंदे हे निवडून आले. 

पराभूत झाल्यानंतर परांजपे यांचे राष्ट्रवादी राजकीय पुनर्वसन करणार असे वाटले होते. मात्र, ते २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत काही झाले नाही. ठाण्यातून त्यांनी २०१९ ला शिवसेनेचे राजन विचारे यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यांचा पराभव झाला. मग राजकारणाने वेगळे वळण घेतले. शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीही फुटली. शरद पवार यांचा हात धरून राष्ट्रवादीत आलेल्या परांजपे यांनी त्यांचाही हात सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राहणे पसंत केले. पुढे विधानपरिषद मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पुन्हा पक्षात मोठे बदल होत विधानपरिषद झिशान सिद्दिकी यांच्याकडे गेली. या परिस्थितीचा फायदा घेत शिंदेसेनेने परांजपे यांना आपल्या गोटात ओढले. 

२००८ ते राष्ट्रवादीत प्रवेशापर्यंत परांजपे यांंच्या राजकारणाला  सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिशा दिली होती. प्रवेशापश्चात परांजपे यांनी ‘माझा डीएनए शिवसेना’ असे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत खा. शिंदे यांच्या निवडणूक प्रचारात परांजपे सहभागी झाले होते. कारण राज्यात महायुती सत्तेवर आली होती. २०२९ मध्ये पुन्हा मतदारसंघ पुनर्रचना होऊन कल्याण लाेकसभा मतदारसंघाचे दोन मतदारसंघ होणार आहेत. त्यापैकी एका मतदारसंघातून परांजपे हे शिंदेसेनेचे उमेदवार असतील, असे राजकीय गणित आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Sena eyes Lok Sabha, finds 'Anand' in Paranjape's return.

Web Summary : Anand Paranjape rejoined Shinde's Sena after failing to secure a position in NCP. He aims for a Lok Sabha seat in the 2029 constituency restructuring, potentially running on Shinde's support, marking a full circle in his political journey.
टॅग्स :Shiv Senaशिवसेना