डोंबिवली : पश्चिमेकडील कुंभारखण पाडा, चिंचोड्याचा पाडा येथे आई रागाई देवी प्रवेशद्वाराच्या कमानीचा लोकार्पण सोहळा रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. मात्र, त्या कमानीवर रागाई देवीच्या फोटोऐवजी कमळाचा फोटो असल्याने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यासह ग्रामस्थांनी हरकत घेतली. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या वाहनांचा ताफा येताच शिंदेसेनेसह भाजपमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली.
दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी समोरासमोर आले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
कार्यक्रमाचे मलाही निमंत्रण होते. पोलिसांनी सांगितले म्हणून मी त्याठिकाणी गेलो नाही. आगामी काळात भाजपने तसे करू नये, अन्यथा जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.विकास म्हात्रे, माजी नगरसेवक, शिंदेसेना
Web Summary : Tension flared in Dombivli West as Shinde Sena activists protested a BJP event featuring a lotus symbol instead of a deity's image. Confrontation ensued, with police intervention preventing escalation. A Shinde Sena leader warned of retaliation for similar future actions.
Web Summary : डोंबिवली पश्चिम में शिंदे सेना कार्यकर्ताओं ने भाजपा के एक कार्यक्रम का विरोध किया, जिसमें एक देवता की छवि के बजाय कमल का प्रतीक था। टकराव हुआ, पुलिस के हस्तक्षेप से मामला शांत हुआ। शिंदे सेना के एक नेता ने भविष्य में ऐसी ही हरकतों पर जवाबी कार्रवाई की चेतावनी दी।