शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्यात सात दिवसांचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:37 IST

कसारा : राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत आठवड्यातून दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. ...

कसारा : राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत आठवड्यातून दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र, दोन दिवसांच्या बंदमुळे कोविड रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कसारा ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य सेवा या स्थानिक प्रशासनाने कसारा व परिसरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता कसाऱ्यात स्वयंस्फूर्तीने सात दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या कर्फ्यूला व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासूनच कसारा बाजारपेठ कडकडीत बंद पाळला होता. अत्यावश्यक सेवेतील सर्वांनी बंदमध्ये सहभाग दाखवून प्रशासनास सहकार्य केले. बंद दरम्यान ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, शहापूर उपविभागीय पोलीस अधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के. ए. नाईक, गणेश माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.

कसारा परिसरात अनेक कोरोना रुग्ण आहेत. काही रुग्ण बाजारपेठेत बिनधास्त फिरत आहेत. शिवाय रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच कोरोना संक्रमणाची चेन तुटावी यासाठी सात दिवसांचे कडक लॉकडाऊन आम्ही जाहीर केले आहे.

- प्रियंका जाधव, सरपंच, मोखवणे

जनहितार्थ स्थानिक प्रशासनाने घेतलेला निर्णय कोरोना संक्रमणाची साखळी तोडू शकेल. या जनता कर्फ्यू दरम्यान जर कोणी विनाकारण फिरताना, विनामास्क फिरताना आढळल्यास, जमाव करून फिरत असल्यास अशा लोकांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

- गणेश माळी, सहायक पोलीस निरीक्षक, कसारा

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने कोअर कमिटी तयार करून जनहितार्थ घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड रुग्ण साखळी तोडण्यास मदत होईल व प्रशासनास योग्य ते सहकार्य होईल.

- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार