शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद; पालकमंत्र्यांचे आदेश

By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 6:29 PM

पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सूचना

ठाणे: मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या शाळादेखील ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबद्दलचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात सहा मोठ्या महानगरपालिका आहेत. त्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर महापालिकांचा समावेश होतो. जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं शाळा सुरू केल्यास विषाणूचा फैलाव अधिक वेगानं होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी संपूर्ण जिल्ह्यातल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच, ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही घेतला महत्त्वाचा निर्णयतत्पूर्वी आज सकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मुंबईतल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. मात्र दिवाळी आणि सणावारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची बाब म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ दिवसांपर्यंत बंद ठेवण्याची घषोणा केली आहे. तसेच २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारे ९ ते १२वीचे वर्गही सुरू न करण्याचे आदेशा पालिका आयुक्तांनी दिले आहे.