सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:57 IST2025-08-29T18:55:43+5:302025-08-29T18:57:00+5:30

विठ्ठलवाडी पोलीस हायजॅक, न्यायालयातून मागणार न्याय

Sarita's suicide was not a suicide but a murder... husband Purushottam Khanchandani's allegation | सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप

सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप

सदानंद नाईक 
उल्हासनगर :
ज्या महिलेचा मुलीसारखा संभाळ केला तीला हाताशी तरुण काही स्थानिक राजकीय पदाधिकारी व नेत्यांनी पर्यावरणवादी सरिता हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप पती पुरषोत्तम खानचंदानी यांनी पत्रकार परिषदेत केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाणे काही राजकीय नेत्यांनी हायजॅक केल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे खानचंदानी म्हणाले.

 हिराली फौंडेशनद्वारे उल्हास व वालधुनी नदीसह शहरातील वायू, ध्वनी व पाणी प्रदूषणाला वाचा फोडून पोलिसांना अनेकांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या समाजसेविका अँड सरिता खानचंदानी यांनी गुरुवारी इमारतीवरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणी पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेत पोलीस व राजकीय नेत्यावर ताशेरे ओढले. स्थानिक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांनी कट रचून सरिता हिची हत्या घडून आणल्याचा गंभीर आरोप केला. त्यासाठी मुलीप्रमाणे सांभाळलेल्या जया गोकलानी हिचा वापर केल्याचे खानचंदानी यांचे म्हणणे आहे. स्थानिक नेत्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हायजॅक केल्याने, न्यायालयातून न्याय मागणार असल्याचे खानचंदानी यांनी सांगितले. 

मारहाणीचा गुन्हा... पोलीस उपायुक्त सचिन गोरे 
जया गोकलांनी या महिलेच्या तक्रारीवरून सरिता खानचंदानी यांच्या विरोधात घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला. 

कोण आहेत जया गोखलांनी
 पती पासून अलिप्त राहणाऱ्या जया गोकलांनी या महिलेने ६ वर्षांपूर्वी सरिता खानचंदानी यांना मदतीचा हात मागितला होता. तसेच स्वतःच्या खोलीत आश्रय देऊन, तीच्या पती विरोधातील खटला न्यायालयात चालवीत होते. बुधवारी रात्री दोघीत भांडण झाल्याने, प्रकरण विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गेले. जया गोखलानी यांच्या तक्रारीवरून घरात घुसून मारहाण, श्रीकृष्ण यांची मूर्ती फोडल्या प्रकरणी सरिता खानचंदानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

मदत आली जीवासी
 ज्या महिलेला मदतीचा हात देऊन पती विरोधात खटला न्यायालयात चालवून न्याय मिळवून दिला. राहण्यास तात्पुरते घर दिले. त्या महिलेने स्थानिक राजकीय नेत्याच्या सांगण्यावरील कट रचून सरिता खानचंदानी यांना संपविले. मदत जीवासी आल्याचा आरोप पुरुषोत्तम खानचंदानी यांनी दिला. 

मोबाईल गायब 
गुरुवारी सकाळी ११ वाजता सरिता खानचंदानी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना गुन्हा दाखल झाल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर सरळ पोलीस स्टेशन सामोरील रीमा इमारतीच्या टेरिसवर जाऊन खाली उडी घेतली.

Web Title: Sarita's suicide was not a suicide but a murder... husband Purushottam Khanchandani's allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.