शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास ठेवायचा तरी कुणावर? जवळचेच करताहेत घात!

By जितेंद्र कालेकर | Updated: April 2, 2026 09:16 IST

गेल्या वर्षात महिलांवर अज्ञातांकडून अत्याचाराचे ३, तर अल्पवयीन मुलींसंबंधित नऊ गुन्हे दाखल झाले.

जितेंद्र कालेकर

ठाणे: ओळखीच्या आडून सलगी वाढवत महिलांवर व तरुणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणेपोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वर्षभरात १,२०४ ओळखीतील किंवा नातेवाईकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे गुन्हे नोंदविले गेले आहेत. या पीडितांमध्ये २९० अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. त्यामुळे अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या वर्षात महिलांवर अज्ञातांकडून अत्याचाराचे ३, तर अल्पवयीन मुलींसंबंधित नऊ गुन्हे दाखल झाले. विनयभंगाचे ६०, तर अल्पवयीन मुलींच्या विनयभंगासह पोक्सोचे २५ गुन्हे नोंदविले. ओळखीच्या आरोपींकडून बलात्काराचे २१०, तर बलात्कारासह पोक्सोचे २९० गुन्हे नोंद झाले. विनयभंगाचे ४८५, तर विनयभंगासह पोक्सोचे २१९ गुन्हे दाखल झाले आहेत.

मुलींनो, गुड टच, बॅड टच ओळखा

व्यक्त्ती कोणतीही असो, ओळखीची किंवा अनोळखी, त्यांच्याकडून होणाऱ्या गुड आणि बॅड टचबाबतची जनजागृती ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून करण्यात येते. गेल्या वर्षभरात शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये दोन हजारांहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम राबविल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.

लहान मुले-मुली यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांना गुड टच आणि बँड टच ओळखण्याची जागृती केली जाते. पोलिसांसह कॉज फाउंडेशन, दिशा फाउंडेशन आदींनी एकत्रित जनजागृती उपक्रम राबवून एक हजार २०७ शाळांमध्ये सेफ्टी ऑडिट केले. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे गांभीर्याने घेत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. अमरसिंह जाधव, पोलिस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर 

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayal by Trusted Ones: Sexual Assaults by Acquaintances Rise

Web Summary : Thane sees surge in sexual assault cases, mostly by known individuals. Police report 1,204 such cases, including 290 involving minors. Awareness programs are conducted in schools to educate about safe and unsafe touch. Police emphasize strict action against perpetrators.
टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस