शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

माझा शेतकरी राज्याचा कणा--- - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 19:29 IST

अतिवृष्टी व पुरामुळे आणि आता अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. या दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची शासनाची भूमिका आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसानसर्व शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार सर्व पालकमंत्री आज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा बांदावर उभे

ठाणे : माझा शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि तो कणा मोडला नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्व या ठिकाणी काम करीत आाहोत आणि या सर्व शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार आहोत, असे सुतोवाच कृषी व फलोत्पादन पणन आणि पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यां प्रसंगी रविवारी केले.     अतिवृष्टी व पुरामुळे आणि आता अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी खोत यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांना धीर दिला. या दरम्यान त्यांनी भिवंडी तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची शासनाची भूमिका आहे. या दृष्टÑीकोनातून मुख्यमंत्र्यांसह उद्धवजी आणि सर्व पालकमंत्री आज राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांचा बांदावर उभे आहेत. शेतकऱ्यांना निश्चितपणाने मदत देण्याच्या भूमिकेतून त्यांना धीर देत आहेत. कारण शेवटी माझा शेतकरी हा राज्याचा कणा आहे आणि तो मोडला नाही पाहिजे, या भूमिकेतून आम्ही सर्व काम करीत आहोत आणि त्यातून निश्चितपणाने शेतकऱ्यांना चांगली मदत मिळवून देणार असल्याचे खोत यांनी या दौऱ्यां प्रसंगी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तर नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.        भिवंडी तालुक्यातील महापोली,पालखणे, सुर्यानगर, विश्वगड, झिडके येथील शेतीच्या नुकसानीची पाहणी खोत यांनी केली. कृषी अधिकारी, तलाठी, कृषीसेवक, तालुका प्रशासनास आदीं यंत्रणांनी लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. भिवंडी कृषी उत्पन्न बाज़ार समिती आवारात शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यां सोबत बैठक घेउन संवाद साधला आणी शेतकऱ्यांना धीर देत मदतीच्या आश्वासनांचा दिलासा दिला.       परतीच्या पावसाने शेतकºयांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्धवस्त झाले आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी यावेळी जारी केले.      यावेळी आमदार शांताराम मोरे, ठाणे ज़िल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती दीपाली पाटील, शिवसेनेचे ग्रामीण ज़िल्हा प्रमुख प्रकाश पाटील, विभागीय कृषि सह संचालक विकास पाटील, ज़िल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अंकुश माने, पंचायत समिति सभापती ज्योती ठाकरे, भिवंडी तहसीलदार शशिकांत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.............फोटो - ०३ठाणे सदाभाऊ खोत

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद