शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

दुःखद! पालिका शौचालयाच्या टाकीत पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 7:24 PM

Death : अशा घटना नेहमीच घडत असल्याने पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देटाकीच्या चेंबरला झाकण नसल्याने अफिफा टाकीत पडून आतील पाण्यात बुडून मरण पावल्याचे समोर आले आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने काशिमीरा उड्डाणपुलाच्या खाली चालवलेल्या सुशोभीकरणाच्या अंतर्गत बांधलेल्या शौचालयाच्या भूमिगत टाकीस झाकण नसल्याने त्यात पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. अशा घटना नेहमीच घडत असल्याने पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील काशिमीरा उड्डाणपुलाच्या खाली महापालिकेने सुशोभिकरणाचे काम चालवले आहे. त्याठिकाणी काशीगाव नाका समोरील पुला खाली सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम केले असून भूमिगत टाकीच्या चेंबरला झाकण नसल्याने टाकीत पडल्यास बुडून मरण पावण्याचा धोका होता.परंतु पालिका अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवकांनी सदर गंभीर बाबी कडे दुर्लक्ष केले. त्यातच मालाडच्या कोकणीपाडा येथून अफिफा मुस्तफा अन्सारी ही चार वर्षांची मुलगी काशिमीरा येथे नातलगां कडे रहायला आली होती. रविवारी अफिफा ही अन्य लहान मुलांच्या सोबत उड्डाणपुला खाली खेळण्यास आली होती.खेळता खेळता ती कुठे गेली कळले नाही. तिचा सर्वजण रात्रभर शोध घेत होते. पोलिसांना सुद्धा कळवण्यात आले. रात्रभर शोधून देखील तिचा शोध लागला नसल्याने सोमवारी सकाळी पुन्हा तिचा शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी शौचालयाच्या भूमिगत टाकीत तिचा मृतदेह आढळून आला. टाकीच्या चेंबरला झाकण नसल्याने अफिफा टाकीत पडून आतील पाण्यात बुडून मरण पावल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊनमृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अफिफा हिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह स्थानिक नगरसेवकांना सुद्धा जबाबदार धरावे अशी मागणी मनसेच्या अनु पाटील, दिनेश कनावजे आदींसह रहिवाश्यांमधून होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूmira roadमीरा रोडPoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाbhayandarभाइंदर