शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी सभापती निवडणूक: पाच महिन्यांच्या पदासाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:37 IST

आज जाहीर होणार तारीख

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सभापतीपद निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे परिवहन समितीमधील बलाबल पाहता या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळे या पदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमध्ये भाजपमधील कोणत्या सदस्याला सभापतीपदी संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक उशिराने होत आहे. त्यामुळे नवनियुक्त सभापतीला पाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.परिवहन समितीमधील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. समितीमधील शिवसेनेचे सदस्य मधुकर यशवंतराव यांचे निधन झाल्याने शिवसेनेची एक जागा रिक्त आहे.स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे आहे. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड आहे. परिवहन समिती सभापतीपदाचा कार्यकाल एक वर्षाचा असतो. मार्चमध्ये शिवसेनेचे सभापती मनोज चौधरी यांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावात सभापतीची निवडणूक होऊ शकली नव्हती. यात विद्यमान सभापती चौधरी यांना मुदतवाढ मिळाली. अखेर, ही रखडलेली निवडणूक आॅनलाइन प्रक्रियेद्वारे आता होणार आहे. केडीएमटी सभापतीपदाची निवडणूक आॅनलाइन पद्धतीने घेण्यासंदर्भात नव्याने आदेश जारी झाल्याने कोकण आयुक्तांकडून या निवडणुकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांच्याकडून जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.भाजपकडून कुणाला मिळते संधी?भाजपच्या सहा सदस्यांपैकी संजय राणे, प्रसाद माळी आणि संजय मोरे यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. राणे आणि मोरे यांची अभ्यासू सदस्य म्हणून समितीमध्ये वेगळी ओळख आहे. परिवहन उपक्रमाच्या उदासीन कारभारावर वेळोवेळी या दोघांनी समितीच्या सभेत आवाज उठविला आहे. या दोघांपैकी एकाला संधी मिळते की, या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाला सभापतीपदावर संधी दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका