उल्हासनगरात रिक्षा चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 15:12 IST2022-03-05T15:11:38+5:302022-03-05T15:12:46+5:30
उल्हासनगर पूर्वेत राहणारा रिक्षा चालक दिपक हिवाळे याने परिसरातील एका १६ वर्षांच्या मुलीसोबत ओळख निर्माण केली. यानंतर, ओळखीचा गैरफायदा घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून तो मुलीवर जबरीने अत्याचार करीत होता.

उल्हासनगरात रिक्षा चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल
उल्हासनगर- शहर पूर्वेतील रिक्षा चालक ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक झाली आहे.
उल्हासनगर पूर्वेत राहणारा रिक्षा चालक दिपक हिवाळे याने परिसरातील एका १६ वर्षांच्या मुलीसोबत ओळख निर्माण केली. यानंतर, ओळखीचा गैरफायदा घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून तो मुलीवर जबरीने अत्याचार करीत होता. या संपूर्ण प्रकाराची माहिती आई-वडिलांना मिळल्यानंतर, त्यांनी थेट विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून, झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून काही तासांत आरोपी दीपक हिवाळे याला अटक केली.
न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.