शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाचा पालिकेला दणका

By admin | Updated: March 24, 2017 01:09 IST

सरकारी जमिनीवर होणारे अतिक्रमण व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी महसूल विभागाने वीजकंपन्यांपाठोपाठ मीरा-भार्इंदर महापालिकेलाही दणका

मीरा रोड : सरकारी जमिनीवर होणारे अतिक्रमण व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी महसूल विभागाने वीजकंपन्यांपाठोपाठ मीरा-भार्इंदर महापालिकेलाही दणका दिला आहे. सरकारी जमिनीसह कांदळवन, पाणथळ व सीआरझेड-१ मधील बेकायदा बांधकामांना पाणीपुरवठा करण्यासह विविध कामे, करआकारणीस मज्जाव केला आहे. अतिक्रमण व बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी पालिकेचीच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे पालिकेस ठणकावले आहे. न्यायालयाने पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी कांदळवन, पाणथळ व सीआरझेड-१ मध्ये भराव, बांधकामास मनाई आहे. असे असताना मीरा-भार्इंदरमध्ये सर्रास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून महापालिकाच पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. शिवाय, सरकारी जागेतही अतिक्रमण व बांधकामे होत आहेत. येथे बांधकाम विभाग सर्रास दिवाबत्ती, गटार-नाले, रस्ते-पायवाटा बांधत आहे. बेकायदा बांधकामांना पाणीपुरवठा सुरू आहे. करआकारणी व हस्तांतरण होत असल्याने सरकारी जमिनीवरील अतिक्रमणास महापालिकाच प्रोत्साहन देत आहे. कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यासह पालिका अधिकारी, कंत्राटदारांविरोधात पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. असे असूनही बेकायदा बांधकामास पालिका पाठीशी घालत आहेत. महसूल विभागाचे मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर यांना या क्षेत्रात वीजपुरवठा व केबल टाकल्यास कारवाईचा इशारा देणारे पत्र दिले होते. अशा भागातील वीजपुरवठा खंडित करा, असे सांगितले होते. (प्रतिनिधी)