शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नेवाळी विमानतळाची जागा परत द्या

By admin | Updated: January 11, 2016 02:33 IST

ब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धर

सुरेश लोखंडे,  ठाणेब्रिटिशकालीन नेवाळी (ता. कल्याण) विमानतळाची जागा वापराविना पडून आहे. त्यामुळे ती शेतकऱ्यांना परत देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली; मात्र त्या जागेची मालकी नौदलाकडे असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर अधिक बोलणे टाळल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील ही चर्चा पुन्हा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वारस आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी व मालवाहू विमाने उतरविण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते. सुमारे सतराशे एकरच्या परिसरातील या विमानतळाचे अस्तित्व तत्कालीन धावपट्टीद्वारे आजही सिद्ध होत आहे. या विमानतळासाठी तत्कालीन शेतकऱ्यांकडून ब्रिटिशांनी या शेतजमिनी प्राप्त केल्या होत्या. विमानतळाचा वापर करणे थांबल्यानंतर त्या जमिनी परत देण्याचा करार झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची ही बाजू मांडण्याचा प्रयत्न संबंधित लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केला. यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या डीपीसीतही तो झाला. मात्र, तो विषय आता नौदलाच्या अखत्यारीतील असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर बोलणे टाळले.या विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार आनंद परांजपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अतिक्रमण हटवण्यास भाग पाडले होते. आता ही जागा संपूर्णपणे नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्याबाबतची संपूर्ण माहिती आता त्यांच्याकडे मिळेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाने संबंधित शेतकऱ्यांना या जमिनीचा संपूर्ण मोबदला दिल्याचेही सांगितले जात आहे. तरीदेखील, संबंधित शेतकऱ्यांचे वारस शोधण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असता केवळ १९ शेतकऱ्यांचे वारस आढळून आले. उर्वरित शेतकऱ्यांचे वारस मात्र आढळत नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.