शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

प्रकल्पांच्या शिळ्या कढीला पुन्हा ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 12:33 AM

महानगरपालिका निवडणुकांसाठी सरकारचे गाजर : जुन्या व सुरू असलेल्या प्रकल्पांचीच केली घोषणा

ठळक मुद्देठाणे शहरांतर्गत मेट्रोलाईट प्रणालीवर आधारित सात हजार १६५ कोटी खर्चाच्या  वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची पवार यांनी घोषणा केली आहे.

नारायण जाधव

ठाणे : राज्य कोरोनाशी जीवघेणा संघर्ष करीत असताना आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्याचे सुमारे ९७ हजार कोटी रुपये थकविलेले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाणे-पालघर जिल्ह्यातील महापालिकांच्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. परंतु, हे सर्वच प्रकल्प जुनेच असून दादांनी पुन्हा त्यांची घोषणा केल्याने ती शिळ्या कढीला ऊत मानली आहे. कारण येत्या काळात नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारसह पुढच्या वर्षी ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक असून त्यासाठी पवार यांच्या या घोषणांकडे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दाखविलेले गाजर म्हणून पाहिले जात आहे.

ठाणे शहरांतर्गत मेट्रोलाईट प्रणालीवर आधारित सात हजार १६५ कोटी खर्चाच्या  वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची पवार यांनी घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावात ठाणे महापालिकेने २९ किमीचे मार्ग आणि २२ स्थानके प्रस्तावित केली असून त्याचा अर्धा खर्च केंद्र सरकार करणार आहे. राज्य सरकार आणि ठाणे महापालिका प्रत्येकी ८४२ कोटींचा खर्च उचलणार असून, उर्वरित निधी कर्जरूपाने उभारण्यात येणार आहे. यामुळे ठाणे शहरासह कळवा-मुंब्रातील वाहतूक गतिमान होऊन रस्त्यांवरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या शिवाय मूळच्या एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या आणि नुकत्याच रस्ते विकास महामंडळाने हस्तांतरित केलेल्या १२६ किमीच्या बहुचर्चित विरार-अलिबाग कॉरिडोरची पुन्हा एकदा पवार यांनी घोषणा केली असली त्यासाठी किती निधी देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेली कित्येक वर्षे या मार्गाच्या भूसंपादनास शेतकऱ्याकडून होणाऱ्या विरोधामुळे ते कागदावरच आहे. याशिवाय ठाणे खाडीला समांतर सुमारे १५ किलोमीटर लांबीचा व ४० मीटर रुंदीचा “ठाणे कोस्टल रोड” उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे एक हजार २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

केंद्राच्या प्रकल्पातही सारखेच जलमार्गपर्यावरण खात्याच्या मंजुरीअभावी गंटागळ्या खाणाऱ्या एमएमआर क्षेत्रातील सर्वच शहरांना जोडणाऱ्या जलवाहतूक मार्गांची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्याचे सूतोवाच करून त्यांनी कोलशेत, काल्हेर, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर येथे जेट्टी उभारण्याचे सांगितले आहे. 

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत हेच जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून, ठाणे महापालिकाच त्यांचे नियोजन करीत आहे. नेरूळ येथील जेट्टीचे कामही जोमाने सुरू आहे. परंतु, वसई-ठाणे-कल्याण-डोंबिवलीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या मार्गांचीही घोषणा करणाऱ्या पवार यांनी निधीविषयी आपल्या भाषणात ब्र शब्द काढलेला नाही.

ठाणे कोस्टल रोडसाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको किती वाटा उचलेल, राज्य शासन किती निधी देते, हे सरकारने सांगितले नसले तरी निवडणूक होऊ घातलेल्या नवी मुंबई शहराला महाविकास आघाडी सरकारने हा एक बुस्टर दिल्याचे मानले जात आहे. 

मुंब्रा बायपास जंक्शन, शीळ-कल्याणफाटा येथे दोन उड्डाणपुलांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असून एमएमआरडीएने निविदांना मान्यताही दिली आहे. तरीही कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पवार यांनी घोषणा केली असून, किती निधी देणार हे मात्र सांगितलेले नाही. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका