शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये ‘आधार’साठी रांगा

By admin | Updated: October 5, 2015 00:21 IST

जव्हार तालुक्यात वर्षभरापासून आधारकार्ड केंद्र बंद झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विक्रमगड, मनोर येथे सुरू असलेल्या केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती

जव्हार : जव्हार तालुक्यात वर्षभरापासून आधारकार्ड केंद्र बंद झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विक्रमगड, मनोर येथे सुरू असलेल्या केंद्राकडे धाव घ्यावी लागत होती. मात्र, शुक्रवारपासून जव्हार पंचायत समितीतील शेतकरी भवन येथे आधारकार्ड केंद्र सुरू केल्याने तेथे रांगा लागल्या आहेत.जव्हार तालुक्याची लोकसंख्या जवळपास १ लाखांच्या घरात पोहोचली आहे. यापूर्वी जव्हार शहरामध्ये अवघी दोन केंद्रे होती. परंतु, तेथील काम संथ असल्याने अनेक आदिवासी बांधव वंचित राहिले होते. दरम्यानच्या काळात विक्रमगड आणि मनोर येथे आधारकार्ड केंद्र सुरू असल्याने येथील नागरिकांनी तेथे धाव घेतली. पण, दोनदोन दिवस फेऱ्या मारूनही काम होत नव्हते, पण आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत असे. सरकारने अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य केले होते. शिष्यवृत्ती, निराधार योजना, गॅसनोंदणी, अनुदानित रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी आधारकार्डची गरज असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आधारची वारंवार गरज भासते.तालुक्यात आधारकार्ड केंद्र वर्षभरापासून बंद झाले होते. ते केंद्र पुन्हा सुरू करावे, याबाबत येथील नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी महसूल विभागाकडे निवेदन देऊन मागणी केली होती. याचीच दखल घेऊन जव्हार पंचायत समितीच्या शेतकरी भवनात केंद्र सुरू केल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वेळी जव्हार पंचायत समितीच्या सभापती यांनी या केंद्राचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)