राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

By पंकज पाटील | Published: January 9, 2024 03:36 PM2024-01-09T15:36:00+5:302024-01-09T15:36:30+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

Ram Mandir is standing, Malanggad will also get liberation in coming time - MP Dr Srikant Shinde | राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

अंबरनाथ : कोणीच विचार केला नव्हता,आज राममंदीर उभे राहत आहे.येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील आपले मुख्यमंत्री देतील, असे आश्वासन मी या ठिकाणी देतो असे विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण उसाटणे येथील मलंगगड हरीनाम उत्सवाच्या सांगता करतांना केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे. कल्याणच्या मलंगगड परिसरातील उसाटणे येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज सप्तहाचा शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ.शिंदे यांनी भाषणात मलंगगड मुक्ती संदर्भात विधान करत सांगितले की आपल्या सर्वाच्या मनामध्ये जी भावना आहे, मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविली. त्याच्यावर काम देखील सुरु आहे.

येणाऱ्या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. या ठिकाणी खात्रीलायक सांगू शकतो. अफजल खानाचा कोथळा दोन वेळा काढण्यात आला.पहिला कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता, तर प्रताप गडावरील अतिक्रमण या सरकारने काढत दुसऱ्यांदा अफजल खानाचा कोथळा काढला. हे जे काम धर्माचे काम आहे. येणारी पिढी ही चळवळ पुढे नेणार आहे, देशात राम मंदिर उभे राहत आहे,त्याचप्रमाणे या मलंगगडाला मुक्ती देखील आपले मुख्यमंत्री देतील असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Ram Mandir is standing, Malanggad will also get liberation in coming time - MP Dr Srikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.