ठाण्यात १७ मे रोजी राज ठाकरेंचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:48 IST2019-05-11T06:48:33+5:302019-05-11T06:48:46+5:30

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १७ मे रोजी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

 Raj Thackeray's Front in Thane on 17th May | ठाण्यात १७ मे रोजी राज ठाकरेंचा मोर्चा

ठाण्यात १७ मे रोजी राज ठाकरेंचा मोर्चा

ठाणे : सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १७ मे रोजी मोर्चा
काढून निषेध व्यक्त केला जाणार आहे. एकीकडे शेतकऱ्यांबरोबर आहोत, असे दाखविले जाते. त्यांना कर्जमाफी दिल्याचा देखावाही केला जातो. प्रत्यक्षात एका शेतकºयाने ठाण्यात आंबे विक्रीचा स्टॉल लावल्यानंतर त्याच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाने कारवाई केली जात असेल, तर याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेचेठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश जाधव यांनी शुक्रवारी दिला. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा व्यवसाय करण्यापासून रोखणे, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी
केला.

Web Title:  Raj Thackeray's Front in Thane on 17th May