शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

By admin | Updated: July 3, 2016 03:25 IST

जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने

ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने धावत होती. यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. तर, दुपारी ऐन शाळा सुटण्याच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना घर गाठताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६६३ एमएम पाऊस पडला आहे.
ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्ये गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. खाडीला भरती आलेली असल्यामुळे ४.७२ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या परिसरातील काही झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. तर, अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर येथील पाण्यात दोन तरुण बुडाल्याची घटना घडली. यातील लक्ष्मण भिवा पुरवार (२५) याचा बुडून मृत्यू झाला असून अनिकेत उत्तम काळे (२५) हा तरुण बचावला आहे. त्याच्यावर कल्याण येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आगामी २४ तासांत कोकणात या पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सातही तालुक्यांत मागील २४ तासांच्या कालावधीत ६६३ मिमी पाऊस पडला असून सरासरी ९४.७१ मिमी या पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार सुरू असलेला हा पाऊस भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३७ मिमी पडला आहे. तर, याखालोखाल ठाणे येथे ११२ मिमी, कल्याण १०३, उल्हासनगर ९४, अंबरनाथ ८६.६०, शहापूरला ७१.४० मिमी पाऊस पडला असून मुरबाडला सर्वात कमी ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.