भिवंडीत लेडीज बार वर छापा; बारबालांसह २६ जणांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: January 31, 2024 16:30 IST2024-01-31T16:30:20+5:302024-01-31T16:30:41+5:30

भिवंडी: शहरा लगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ऑर्केस्ट्रा बार चे पेव फुटले असून या ठिकाणी महिला वेटर बारबालांकडून अश्लील ...

Raid on Ladies Bar in Bhiwandi; A case has been registered against 26 people including Barbal | भिवंडीत लेडीज बार वर छापा; बारबालांसह २६ जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत लेडीज बार वर छापा; बारबालांसह २६ जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी: शहरा लगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ऑर्केस्ट्रा बार चे पेव फुटले असून या ठिकाणी महिला वेटर बारबालांकडून अश्लील नृत्य व हावभाव करून मद्यपींना प्रलोभित केले जात आहेत. या विरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर नारपोली पोलिसांनी हद्दीतील लेडीज बारवर छापा टाकून बारबालांसह २६ जणांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

         तालुक्यातील वळ पाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथे सुरू असलेल्या संगीत ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंट येथे भोजपुरी गाण्यावर सात महिला बारबाला मद्यपीं समोर अश्लील हावभाव करून नृत्य करताना आढळून आल्याने ठाणे खंडणी विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिस ठाण्यात सात बारबालांसह व्यवस्थापक, कशियर, मुझिक ऑपरेटर, वेटर व ग्राहक अशा एकूण २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: Raid on Ladies Bar in Bhiwandi; A case has been registered against 26 people including Barbal