शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प

By admin | Updated: November 14, 2016 04:12 IST

संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प गुंफले, ते ‘रानी की बाव’ या नृत्याविष्कार आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त

ठाणे : संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे तिसरे पुष्प गुंफले, ते ‘रानी की बाव’ या नृत्याविष्कार आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्र माने. या दोन्ही कार्यक्रमांनी रसिकांची मने जिंकली. या महोत्सवाच्या पहिल्या सत्रात मुक्ता जोशी आणि नृत्यधारा यांनी बसवलेला ‘रानी की बाव’ हा संगीतनृत्याचा कार्यक्र म सादर झाला. लोकांना अजूनही फारसे परिचित नसलेले ‘रानी की बाव’ हे समृद्ध प्राचीन वारसा असलेले गुजरातमधील पाटणजवळील ठिकाण. अजिंठा-वेरूळ, खजुराहो यांच्या तोडीचे. येथे जमिनीखाली सात मजले असलेले अप्रतिम शिल्प आहे. १९८६ साली एका गुराख्याच्या सतर्कतेने या मंदिराचा शोध लागला. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून या मंदिराला स्वीकारले आहे. सोलंकी घराण्यातील राणी उदयमती हिने एक हजार वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या, राजा भीमदेवाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे जमिनीखालील मंदिर घडवले. नृत्यधाराच्या कलाकारांनी आपल्या नृत्यनाट्यातून हे मंदिर घडवण्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर या मंदिराचे सौंदर्य-नजाकत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. यासाठी स्लाइड-शो, व्हिडीओ फिल्म यांचा समर्पक वापर केला होता. एखादी फारशी परिचित नसलेली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नृत्यनाट्य हे किती प्रभावी माध्यम आहे, याची प्रचीती कलाकारांनी आणून दिली. दुसऱ्या सत्रात पलुस्कर यांच्या जीवनाचा प्रवास उलगडण्यात आला. उणेपुरे ३५ वर्षे आयुष्य लाभलेल्या पलुस्करांनी अल्पवयातच भारतभर कीर्ती मिळवली. बैजू बावरा चित्रपटाने त्यांना कीर्तीच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या जीवनावर आधारित या कार्यक्र मामुळे रसिकांना जुना ठेवा अनुभवण्याची संधी मिळाली. (प्रतिनिधी)