डोंबिवलीत आज प्रतीकात्मक आंदोलन, निवडणुकीसाठी क्रीडासंकुल घेतल्याने व्यायामपटू करणार निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:36 AM2019-03-20T03:36:15+5:302019-03-20T03:36:36+5:30

लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे.

 Protestant movement in Dombivli today, prohibition of gymnasium by sportspersons for elections | डोंबिवलीत आज प्रतीकात्मक आंदोलन, निवडणुकीसाठी क्रीडासंकुल घेतल्याने व्यायामपटू करणार निषेध

डोंबिवलीत आज प्रतीकात्मक आंदोलन, निवडणुकीसाठी क्रीडासंकुल घेतल्याने व्यायामपटू करणार निषेध

Next

कल्याण : लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या डोंबिवलीतील क्रीडासंकुलाचाही ताबा घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथील जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर टाच येणार आहे. त्याचा निषेध म्हणून व्यायामपटू बुधवारी प्रतिकात्मक आंदोलन करणार आहेत. व्यायामशाळेचे सदस्य व शिवसेनेचे कल्याण ग्रामीण व पूर्व विधानसभा क्षेत्र संघटक कैलास शिंदे यांनी याबाबत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मतदान २९ एप्रिलला होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक यंत्रणेचे कामकाज जोमाने सुरू झाले आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान लागणारे साहित्य तसेच निवडणुकीच्या कामासाठी बाहेरून येणारा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासासाठी निवडणूक विभागाने केडीएमसीच्या मालमत्तांचा ताबा घेतला आहे. मात्र, त्यापूर्वी क्रीडासंकुलातील व्यायामशाळा व जलतरण तलाव बंद करून मुलांच्या खेळावर टाच आणू नये, असे पत्र शिंदे यांनी निवडणूक विभागाला दिले होते. तसेच केडीएमसीचे सभागृहनेते श्रेयस समेळ यांनीही आयुक्तांना पत्र पाठवून तरण तलावाची जागा देऊ नका, असे स्पष्ट केले होते. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष व डोंबिवली शहरअध्यक्ष राजेश कदम यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार महापालिका प्रशासनाने जागेचा ताबा निवडणूक विभागाकडे दिला आहे. दरम्यान, याचा निषेध म्हणून व्यायामपटूंनी प्रतिकात्मक आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बुधवारी डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल येथे व्यायामाचे सर्व साहित्य घेऊन रस्त्यावर व्यायाम करून आंदोलन केले जाणार आहे. त्यात व्यायामपटू सहभागी होणार आहेत.

सुरक्षिततेच्या कारणास्तव वापर बंदच : क्रीडासंकुलाचा ताबा निवडणूक विभागाने घेतला आहे. तरणतलाव आणि व्यायामशाळेच्या वापरावर येणारे निर्बंध पाहता दुसºया बाजूने प्रवेश दिला जाईल, असे संबंधित विभागाकडून सांगितले जात असलेतरी सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याचा वापर करता येणार नाही. तरणतलाव आणि व्यायामशाळा बंदच ठेवावी लागेल, अशी माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.

सुटीच्या आनंदावर विरजण ?

क्रीडासंकुलातील तरणतलावाचे ६३०च्या आसपास आजीवन सदस्य आहेत. ते नियमितपणे पोहोण्यासाठी येतात. तसेच व्यायामशाळेचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

आता तर उन्हाळी सुटी सुरू होणार असल्याने याठिकाणी येणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे. परीक्षा संपल्यानंतर मुले सुटीत खेळासाठीही या क्रीडासंकुलाचा वापर करतात.

परंतु, निवडणूक विभागाने त्याचा ताबा घेतल्याने त्यांच्या खेळावर विरजण पडणार आहे. हे टाळण्याकरता व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर घेतल्यास सर्व बाजूने सोयीस्कर होईल, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title:  Protestant movement in Dombivli today, prohibition of gymnasium by sportspersons for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.