शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांकडून अंधश्रद्धेला बळ

By admin | Updated: October 10, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा

- अरविंद म्हात्रे,  चिकणघरकल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा कालावधी असताना ६ ते ९ आॅक्टोबर अशा चार दिवसांत एकाही पक्षाने अथवा अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. अथवा, अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. यावरून पितृपक्षात उमेदवारी अर्ज न भरणे, ही अंधश्रद्धा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये वाढीस लागली आहे. अर्ज नेणे आणि सबमिट करण्यासाठी मुहूर्त बघितले जात आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आठवडा झाला आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची नावेही जाहीर केली नाहीत. त्यासाठीदेखील मुहूर्त पाहणे सुरू आहे. यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींकडे सामाजिक अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणारा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. मात्र, हे राजकीय प्रतिनिधीच जर अर्ज भरणे आणि ते जमा करण्यासाठी पितृपक्षाचा अडसर मानत असतील तर अंधश्रद्धा वाढीस राजकारण्यांकडूनच बळ मिळत आहे, हे समोर येत आहे. शेवटच्या दिवशी गर्दी.. - १२ आॅक्टोबरला पितृपक्ष सायंकाळी संपणार आहे. तोपर्यंत १२ तारखेची अर्ज भरण्याची वेळ निघून जाणार आहे. मग, फक्त १३ आॅक्टोबर हा शेवटचा एकच दिवस उरणार असून अर्ज भरण्याची वेळ इतर दिवसांपेक्षा एक तासाने कमी असून ११ ते २ अशी आहे. यामुळे प्रत्येक अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असून वेळ पुरणार नसल्याची स्थिती ओढवली तर अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास मुकावे लागेल. - निवडणूक अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार चार दिवस ते केवळ बसून असून काहीच काम होऊ शकलेले नाही. याचा विचार राजकीय पक्षांनी करण्याऐवजी पितृपक्षाची भीती घेऊन अर्ज भरले गेले नाही, हेही स्पष्ट झाले.- ज्यांच्यावर सामाजिक परिवर्तनाची धुरा आहे, असे राजकारणीच अंधश्रद्धेला बळ देऊ लागले तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता आहे. मग, अशा राजकारण्यांकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात, हा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.