शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतून वाहतोय प्रदूषणकारी हिरवा नाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 00:46 IST

पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही.

कल्याण  -  पाच वर्षांपूर्वी हिरवा पाऊ स पडलेल्या डोंबिवली शहरात चक्क हिरव्या पाण्याचा नाला वाहू लागला आहे. अनेक वर्षांपासून येथील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असून त्याविरोधात पर्यावरणवाद्यांकडून लढा सुरू आहे. मात्र, प्रदूषणाच्या समस्येत काहीच फरक पडलेला नाही.डोंबिवलीतील प्रदूषणाच्या त्रासाने नागरिक त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांकडून प्रदूषणाविरोधात लढा सुरू आहे. डोंबिवलीत एकदा हिरवा पाऊस पडला होता. त्यापाठोपाठ आता डोंबिवलीतून हिरव्या रंगाचा नाला वाहतोय. येथील प्रदूषण नियंत्रणात आलेले नाही, तर ते वाढलेले आहे.प्रदूषणप्रकरणी एमआयडीसीने आपली जबाबदारी झटकत यासाठी कंपन्यांना जबाबदार धरले आहे. एमआयडीसीने यावर अजब तोडगा सुचवत, पावसाचे पाणी सांडपाणी केंद्रात सोडू नका, अशी तंबी कंपन्यांना दिली आहे. मात्र, पावसाला अद्याप सुरुवातच झालेली नसताना, एमआयडीसीने दिलेला सल्ला म्हणजे कातडीबचाव धोरणाचाच भाग असल्याची टीका होत आहे. अशा प्रकारे दोषारोप करून प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघूच शकत नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.डोंबिवलीच्या नांदिवली नाल्यातून शनिवारी हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. त्याचा त्रास रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांना झाला. नागरिकांनी याविषयी तक्रार केली आहे. २०१४ मध्ये डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याने प्रदूषणाचा विषय चर्चेत आला होता. त्यानंतर, प्रदूषणाची मात्रा कमी झाल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळासह सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्यांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात प्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. प्रक्रिया न करताच रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याने नाल्यातून रसायनमिश्रित हिरवे प्रदूषित पाणी वाहत होते. ही केवळ एक दिवसाची तक्रार नाही. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कारखान्यांतून सांडपाण्यावर योग्य निकषांच्या आधारे प्रक्रिया केली जात नसल्याने वनशक्ती या पर्यावरण संस्थेने दाखल केलेला हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रदूषण रोखण्याचा दावा न्यायप्रविष्ट आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे. डोंबिवलीतील रासायनिक व कापड उद्योग प्रक्रियेतून प्रक्रियेपश्चात निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाºया वाहिन्या आहेत. या वाहिन्यांचे चेंबर ओव्हरफ्लो होतात. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भरारी पथकाच्या पाहणीत रासायनिक सांडपाणी वाहून नेण्याºया वाहिन्यांचे चेंबर्स ओव्हरफ्लो होत असल्याप्रकरणी एमआयडीसीला जाब विचारला असता एमआयडीसीने याप्रकरणी सर्व कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत.नोटीसमध्ये एमआयडीसीने म्हटले आहे की, नाल्यात कापड, धागे, प्लास्टिक अडकून चेंबर्स ओव्हरफ्लो होत आहेत. त्याचबरोबर केवळ रासायनिक सांडपाणी या वाहिन्यांद्वारे न सोडता त्याद्वारे पावसाचे पाणी सोडले जात असल्याने चेंबर्स ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी नाल्यात जाऊन मिसळते. पावसाचे सांडपाणी एका स्वतंत्र वाहिनीद्वारे नाल्यात न सोडल्यास कारखाने बंद करण्याची तंबीही देण्यात आली आहे.जबाबदारी झटकून कंपन्यांकडे बोट दाखवत केला बचावडोंबिवली एमआयडीसीतील फेज नंबर-२ मधील रासायनिक सांडपाणी केंद्र हे १.५ दक्षलक्ष लीटर क्षमतेचे आहे. त्यांचे अपग्रेडेशन केल्याप्रकरणी जागतिक पर्यावरणदिनी वसुंधरा पुरस्काराने या केंद्राला सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरवले आहे. तरीदेखील नाल्यात प्रक्रियेविना रासायनिक सांडपाणी सोडले जात असेल, तर अपग्रेडेशन कशाचे केले आणि पुरस्कार कशाच्या आधारे दिला गेला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.वाहिन्या व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती एमआयडीसीने करणे अपेक्षित आहे. मात्र जबाबदारी झटकत कंपन्यांकडे बोट दाखवून मंडळाच्या भरारी पथकाच्या कारवाईतून बचावासाठी एमआयडीसीने नोटीस पाठवल्यात. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाpollutionप्रदूषण