शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

ठाणे जिल्ह्यात २,०४,५५० बालकांना आज पोलिओ डोस; आराेग्य यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 1:04 AM

ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील पालकांनी त्यांच्या शून्य ते पाच वयोगटांतील दोन लाख चार हजार ५५० बालकांना पोलिओ डोस आवश्यक पाजावे

ठाणे  - जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ३१ जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे. यास अनुसरून जिल्ह्यातील पालकांनी त्यांच्या शून्य ते पाच वयोगटांतील दोन लाख चार हजार ५५० बालकांना पोलिओ डोस आवश्यक पाजावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, आरोग्य व बांधकाम सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे.या पल्स पोलिओ मोहिमेसाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याबाबत त्यांनी सूचित केले. या मोहिमेदरम्यान उपसंचालक ठाणे मंडळ डॉ. गौरी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब केला जाणार आहे. रविवारनंतरही पुढील पाच दिवसांत बुथवरील लाभार्थी व्यतिरिक्त उर्वरित लाभार्थ्यांना घरोघरी जाऊन पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.पल्स पोलिओ मोहिमेपुढील आव्हानठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूरसह भिवंडी परिसरात आदिवासी पाडे मोठ्या संख्येने आहेत. सध्या कोरोना काळ सुरू असल्याने दुर्गम आदिवासी पाड्यातील बालकांना डोस पाजण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.कोविडच्या भीतीने अनेक पालक अंगणवाड्यांत आपल्या मुलांना पाठवीतच नसल्याने त्यांचा शोध घेऊन डोस पाजणे अंगणवाडी सेविकांसह आशा वर्करसमोर मोठे आव्हान आहे. आधीच कोविड काळात या सेविका, आरोग्यसेवक पोषण आहार पुरविताना हैराण झाल्यात. जिल्ह्यातील संबंधितांना या मोहिमेबाबत सर्व स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील सर्व ० ते ५ वयोगटांतील बालकांच्या पल्स पोलिओ लसीकरणाची तयार पूर्ण केली आहे.- डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य