शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

ठाण्यात आॅनलाईन जुगार अड्डयांवर दोन ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र: ११ जुगाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 9:25 PM

सावरकरनगर आणि लोकमान्यनगर भागात आॅनलाईन जुगार सुरु असल्याची तक्रार ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. याच तक्रारीची दखल घेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी ठाण्यातील दोन जुगार अड्डयांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देअतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिले होते कारवाईचे आदेशलोकमान्यनगर आणि सावरकरनगर येथे धाड रोकडसह ७१ हजारांची सामुग्री जप्त

ठाणे: संगणकांवर बेकायदेशीरपणे आॅनलाईन जुगार चालविणाऱ्या लोकमान्यनगर आणि सावरकरनगर अशा दोन ठिकाणच्या अड्डयांवर वर्तकनगर पोलिसांनी सोमवारी धाडसत्र राबविले. या दोन्ही कारवाईमध्ये ११ जणांची धरपकड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये संगणक, काही रोकड आणि लुगाराच्या सामुग्रीसह ७१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सावरकर नगर येथील ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्याजवळील परिसरात तसेच लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार या दोन ठिकाणी आॅनलाईन जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे गिरधर तसेच सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकांनी या दोन्ही अड्डयांवर सोमवारी दुपारी एकाच वेळी धाडसत्र राबविले. त्यावेळी इंटरनेटच्या सहाय्याने आॅनलाईन जुगार सुरु होता. यात सावरकर नगर येथील अड्डयावरुन ४४ हजार ४७० तर लोकमान्यनगर येथील अड्डयावरुन २६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये मनोज जैस्वाल, बबलू थापा, सुरेश कदम,अर्जुन पाटकर, शंकर प्रजापती, शिवाजी पाचिपल्ले आणि शिबूसनक राजकुमार यांना तर लोकमान्य नगर येथून किरण मोरे ,मनोज आगारे आणि जनक शर्मा आदी ११ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.वर्तकनगर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने या जुगाराची तक्रार ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे केली होती. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीraidधाड