महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबल महिलेने आत्महत्य केल्याची घटना घडली आहे. ड्युटीवून घरी आल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरून महिलेने उडी मारली, त्यात तिचा मृत्यू झाला. बदलापूर पश्चिममध्ये २९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
श्रावणी वारिंग (वय ३६) असे पोलीस कॉन्स्टेबल महिलेचे नाव आहे. त्या बदलापूर पश्चिममध्ये राहत होत्या. वेदांत नक्षत्र या इमारतीत वास्तव्यास असलेल्या श्रावणी यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
ड्युटीवरून घरी आल्या आणि आत्महत्या केली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावणी वारिंगे या २९ ऑगस्ट रोजी ड्युटीवर गेल्या होत्या. रात्री त्या घरी परतल्या. घरी आल्यानंतर काही वेळाने त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. इमारतीतील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली.
श्रावणी वारिंगेंनी का उचलले टोकाचे पाऊल?
प्राथमिक माहितीनुसार, श्रावणी वारिंगे यांच्या कुटुंबात वाद सुरू होते. कौटुंबिक वादामुळे त्यांना नैराश्य आलं होतं. त्या काही काळापासून तणावात होत्या. नैराश्यातूनच त्यांनी २९ ऑगस्ट रोजी इमारतीतून खाली उडी मारली आणि आत्महत्या केली.