शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

ठाण्यातील दूध विक्रेत्यांना बसला लाठीचा मार: तक्रार येताच विशेष पासेस देण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

By जितेंद्र कालेकर | Published: March 30, 2020 8:34 PM

नौपाडयात दूध विक्री करु न परतणाऱ्या दोघांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला होता. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत ठाणे शहरातील सर्व दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्तांच्या मार्फतीने अत्यावश्यक सेवेचे पासेस देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

ठळक मुद्दे‘लोकमत’ने केला पाठपुरावादूध विक्रेता संघटनेने केली होती तक्रार

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणो: शहरातील कळवा आणि नौपाडा या दोन वेगवेळया भागांमध्ये संचारबंदीच्या काळात पोलिसांनी दूध विक्र ेत्यांवर कारवाई केल्याने या विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर होता. कळव्यात गुन्हे दाखल केले होते. तर नौपाडयात दूध विक्री करु न परतणा-या दोघांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला होता. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत ठाणे शहरातील सर्व दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्तांच्या मार्फतीने अत्यावश्यक सेवेचे पासेस देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.नौपाडयातील मल्हार सिनेमा समोरील रस्त्याने २४ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ओंकार जाधव (१९, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणो) आणि प्रतिक महालम (२२, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी लाठीचा फटका मारला. विशेष म्हणजे त्याच मार्गावरु न आधी ते दूध घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली तेंव्हा त्यांनी आपण दूध घेऊन जात असल्याचे सांगितले. एका व्यापा-याला २० लीटर दूध देऊन ते परतल्यानंतर मात्र त्यांच्यावर गस्तीवरील पोलिसांच्या एका पथकाने लाठी हल्ला केला. दरम्यान, कळव्यातही अशाच प्रकारे दोन विक्रेत्यांविरुद्ध रस्ता अडवून दूधाची विक्री केल्याप्रकरणी कलम १०२ नुसार पोलिसांनी कारवाई केली. तर वर्तकनगर भागात २४ मार्च रोजी सकाळी ग्राहकांनी दूध खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी तिथेही कारवाईचा इशारा देताच तिथून विक्रेत्यांनी पळ काढला. ठिकठिकाणी होणा-या अशा कारवायांमुळे दूध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काहीतरी ओळखपत्र किंवा नियमावली असावी, अशी मागणी ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सह सचिव पांडूरंग चोडणेकर यांनी केली. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही १४ एप्रिलनंतरच त्यांना भेटू शकता असे त्यांना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे ही आपबिती कथन केली. तेंव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. याची गांभीर्याने दखल घेत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व दूध विक्र ेते आणि दारोदारी दूध टाकणा-या तरु णांना संबंधित पोलीस ठाणे अथवा पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयातून अत्यावश्यक सेवेची ओळखपत्र देण्याबाबतचे आदेश त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट येथील पोलीस उपायुक्तांना दिले. कोणत्याही दूध विक्रेत्यावर अशा प्रकारे कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश दिल्याचेही फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

‘‘ दूध विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पोलिसांकडून ओळखपत्र दिली जातील. तसेच अनावश्यक कोणावरही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यापुढेही देण्यात येतील.’’विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर‘‘ दूध विक्रेत्यांवरही नाहक लाठीहल्ला किंवा गुन्हे दाखल होणार असतील तर दूध विक्री करायची कशी? यात ठोस नियमावली किंवा ओळखपत्र देण्याची गरज आहे.’’पांडूरंग चोडणेकर, सह सचिव, ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था, ठाणे

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMilk Supplyदूध पुरवठा