शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेत पेनडाऊन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:53 IST

भाजप नगरसेवकांची दबंगगिरी : शहर अभियंत्यासोबत घातला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहर अभियंता  महेश शितलानी यांच्याशी भाजप नगरसेवकांनी सोमवारी वाद  घालत आरडाओरडा केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. यावेळी कामगार नेते राधाकृष्ण साठे यांची मध्यस्थी अयशस्वी झाल्यावर नगरसेवकांच्या दबंगगिरीच्या निषेधार्थ कामगार संघटनेने मंगळवारी पेनडाऊन आंदोलन करून नगरसेवकांच्या दबंगगिरीचा निषेध केला. बांधकाम विभागाकडून भाजपच्या १३ नगरसेवकांची विकासकामे होत नाही याचा जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी व नगरसेवक प्रदीप रामचंदानी असे तिघे सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान बांधकाम विभागात गेले. शितलानी यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांच्यात वाद झाला. यावेळी सर्वाधिक आवाज रामचंदानी यांचा येत असल्याने, महापालिका मुख्यालयात उपस्थित असलेले कामगार नेते साठे तेथे गेले. त्यांनी रामचंदानी यांना समजावत आरडाओरड करू नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शितलानी हे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्यासोबत विकासकामे पाहण्यासाठी निघून गेले.रामचंदानी यांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ मंगळवारी कामगारांनी पेनडाऊन आंदोलनाची हाक दिली. दुपारपर्यंत कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र दुपारनंतर आयुक्तांच्या विनंतीला मान देत काम सुरू केल्याची माहिती साठे यांनी दिली. नेहमी वादात राहिलेल्या बांधकाम विभागाला अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळालेला नाही. शितलानी यांच्याकडे शहर अभियंता पदासह बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचा प्रभारी पदभार दिला आहे. दरम्यान, शितलानी यांची तब्येत बरोबर नसल्याने ते पूर्ण वेळ देऊ शकत नाही. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, पालिकेच्या सर्वच विभागात सावळागोंधळ असल्याने कारभारावर येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेत कुणाचेच नियंत्रण नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

कामाबाबत चर्चा करणे गैर आहे का?... रामचंदानी यांचा सवालभाजप नगरसेवकांची विकासकामे होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलो तर गैर काय?. चर्चेवेळी आरडाओरड झाली. कामगार संघटनेने यामध्ये पडणे कितपत योग्य आहे?. असा प्रश्न भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला.