इमारतीच्या जिन्याचा भाग पडला; तात्काळ इमारत सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 22:05 IST2021-06-11T22:04:57+5:302021-06-11T22:05:04+5:30
इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्यानंतर त्या कुटुंबाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्वतःने आपआपल्या राहण्याची व्यवस्था केली.

इमारतीच्या जिन्याचा भाग पडला; तात्काळ इमारत सील
ठळक मुद्देइमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्यानंतर त्या कुटुंबाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्वतःने आपआपल्या राहण्याची व्यवस्था केली.
ठाणे - कोलशेत रोडवरील ढोकाळी गाव येथे असलेली ३५ वर्ष जुनी 'चौधरी निवास' नामक तळ अधिक दोन मजली इमारतीच्या जिन्याचा भाग शुक्रवारी सायंकाळी अचानक कोसळला. सुदैवाने याघटनेत कोणीलाही दुखापत झालेली नाही. पण, खबरदारी लक्षात घेत, ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ती इमारत तातडीने खाली करून सील केली.
या इमारतीत तीन कुटुंब वास्तव्यास होते. इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्यानंतर त्या कुटुंबाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्वतःने आपआपल्या राहण्याची व्यवस्था केली. या घटनेची नोंद ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेत करण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख संतोष कदम यांनी दिली.