भाजपच्या प्रशिक्षण शिबिरास पंकजा मुंडेंनी फिरवली पाठ

By नितीन पंडित | Updated: July 13, 2023 21:24 IST2023-07-13T21:24:10+5:302023-07-13T21:24:33+5:30

पंकजा मुंडे या प्रशिक्षण शिबिरात नसल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसली आहे.

Pankaja Munde turned her back on BJP's training camp | भाजपच्या प्रशिक्षण शिबिरास पंकजा मुंडेंनी फिरवली पाठ

प्रतिकात्मक फोटो

भिवंडी : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने भिवंडीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात भाजपचे राज्यात असलेले सर्व केंद्रीय तसेच राज्यातील मंत्री आमदार खासदार यांच्यासह नेते उपनेते व पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र या प्रशिक्षण शिबिरात पंकजा मुंडे यांनी मात्र पाठ फिरवली. पंकजा मुंडे या प्रशिक्षण शिबिरात नसल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसली आहे.

पंकजा मुंडे यांच्या गैरहजेरी बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता पंकजा मुंडे या त्यांच्या घरातील एका व्यक्तीच्या पायाला झालेल्या जखमेमुळे येऊ शकल्या नाहीत. मात्र त्यांचा भाजपला व या शिबिराला पूर्ण पाठिंबा असून या शिबिराच्या आयोजनात देखील त्या आहेत. असे सरवासारवीचे उत्तर बावनकुळे यांनी दिले. मात्र एकीकडे केंद्रीय मंत्र्यांपासून सर्वच नेते व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असताना पंकजा मुंडे गैरहजर राहिल्याने त्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे.
 

Web Title: Pankaja Munde turned her back on BJP's training camp