शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याला १५ हजार किलो श्रीखंड

By admin | Updated: March 25, 2017 01:21 IST

गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट आहे आणि यंदाच्या पाडव्याला ठाणेकर ते चक्क्याइतके घट्ट करतील, अशी स्थिती आहे.

ठाणे : गुढीपाडवा आणि श्रीखंडाचे नाते अतूट आहे आणि यंदाच्या पाडव्याला ठाणेकर ते चक्क्याइतके घट्ट करतील, अशी स्थिती आहे. यंदा आतापर्यंत नोंदवलेली मागणी पाहता जवळपास १२ हजार ते १५ हजार किलो श्रीखंड फस्त होईल, अशी स्थिती आहे.शिवाय घराघरात तयार होणाऱ्या मलईदार श्रीखंडासाठी साधारण सात हजार किलो चक्क्याची मागणी नोंदवली गेल्याचे विविध प्रथितयश विकेत्यांनी सांगितले. दिवाळीला जशी फराळाच्या पदार्थांसोबत मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी होते, तसेच गुढीपाडव्याला श्रीखंडाच्या खरेदीला उधाण येते. या दिवशी ग्राहकांना वेगवेगळ्या चवींचे श्रीखंड उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांत चढाओढ लागते. एरव्ही दुकानात गेले की श्रीखंड, आम्रखंड हे दोन प्रकार उपलब्ध असतात. पूर्वी फक्त चारोळ््या घातलेले श्रीखंड मिळत असे. आता फळांपासून सुक्यामेव्यापर्यंत अनेक पदार्थांचा त्यात समावेश असतो. त्याचेही फ्यूजन केलेले असते. त्यामुळे श्रीखंड हा पदार्थही पारंपरिक उरलेला नाही.पाडव्याशी जोडले गेलेले श्रीखंडाचे नाते पाहता, मागणीचा विचार करता त्यात भरपूर प्रयोग केलेले पाहायला, चाखायला मिळतात. केशर आणि वेलचीयुक्त श्रीखंड (साधारण २८० रु. किलो), फ्रेशफ्रुट श्रीखंड, ड्रायफ्रुट श्रीखंड, स्ट्रॉबेरी, मिरची, रासबेरी, चिकू, संत्री, मोसंबी असे प्रकार पाडव्यानिमित्त चोखंदळ ग्राहकांची पसंती मिळवतात. श्रीखंडात विविध प्रकार असले तरी केशरी श्रीखंड आणि आम्रखंडाला सर्वाधिक मागणी असते. पोटभर श्रीखंड खाणारे या दोन प्रकारांना पसंती देतात, तर इतर प्रकारांच्या श्रीखंडांची चवीपुरती खरेदी होत असल्याचे विक्रेते संजय पुराणिक यांनी सांगितले. इतर प्रकारांचे श्रीखंड पाव किलो खरेदी केले जात असेल, तर केशरयुक्त आणि आम्रखंड यांची खरेदी किलो किलोत होते. ग्राहकांना चवीत बदल हवा असल्याचे मत टीप टॉपचे रोहितभाई शहा यांनीही मांडले.रेडीमेड श्रीखंडाबरोबरच घरी श्रीखंड बनवण्यासाठी चक्का खरेदीची परंपराही कायम आहे. यंदा पाडव्यानिमित्त सात हजार किलो चक्क्याची खरेदी होणार आहे. पूर्वी चक्का खरेदी भरपूर प्रमाणात होत असे. पण आता वेळ नसल्याने थेट श्रीखंड खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. श्रीखंडाच्या खरेदीला आदल्या दिवशीपासून सुरूवात होते, ती थेट पाडव्याच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत म्हणजे पंगती बसेपर्यंत सुरू असते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. (प्रतिनिधी)