Oxygen stock in Thane Municipal Corporation's Covid Center ended | CoronaVirus in Thane: ठाण्यात धावपळ! महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपला; रुग्णांना हलविण्याचे काम सुरु

CoronaVirus in Thane: ठाण्यात धावपळ! महापालिकेच्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा साठा संपला; रुग्णांना हलविण्याचे काम सुरु


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : ठाण्यात लसींचा आणि रेमडीसीव्हर या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असतांना आता महापालिकेच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या ज्युपीटर रुग्णालया शेजारी असलेल्या पार्कीग प्लाझा कोवीड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील ऑक्सीजन आणि आयसीयुमध्ये असलेल्या २६ रुग्णांना तत्काळ हलविण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले. त्यामुळे या रुग्णालयाबाहेर एकाच वेळेस २० ते २५ रुग्णवाहीका लागल्याचे दिसत आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे नातेवाईक मात्र भयभीत झाल्याचे दिसून आले.


ठाणे  शहरात रोजच्या रोज १५०० ते १८०० रुग्ण नव्याने वाढत आहेत. त्यात या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीव्हरचे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मागील काही दिवसापासून धावपळ सुरु आहे. दुसरीकडे लसीकरण देखील शहरात थांबले आहे. अशातच आता महापालिकेच्या पार्कीग प्लाझाच्या कोवीड सेंटरमधील ऑक्सीजनचा साठा संपुष्टात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या सेंटरमध्ये अवघे दोन बाटले शिल्लक असल्याची माहिती पुढे आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. शनिवारी संध्याकाळी या रुग्णालयासाठी ऑक्सीजनचा साठा उपलब्ध होणार होता. मात्र तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. तसेच जो साठा येणार आहे. तो केवळ ८ ते १० टनार्पयत रविवारी सकाळी किंवा दुपार र्पयत येणार आहे. परंतु तो देखील अपुरा पडणार असल्याने, आधीच दक्षता म्हणून रुग्णांना हलविण्याचे काम सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.


परंतु येथे काम करणा:या एका कर्मचा:याच्या म्हणन्यानुसार येथील ऑक्सीजनचा साठा संपला असून केवळ दोनच बाटले शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधून रुग्ण हलवावे लागतील असे सांगितल्यानंतर प्रशासनाने ही पावले उचलली असल्याचे सांगितले. हे रुग्णालय जवळ जवळ १ हजार बेडचे आहे. मागील दोन आठवडय़ापूर्वीच हे रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी सध्याच्या घडीला ५५० हून अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर ११ आयसीयु, आणि ऑक्सीजनवर १६ असे मिळून २६ रुग्ण येथे ऑक्सीजनवर असून त्यांना शनिवारी सांयकाळी हलविण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यामुळे येथे २० ते २५ रुग्णवाहीका एका मागोमाग एक उभ्या झाल्या होत्या. त्यानंतर एक एक करुन रुग्णांना हलविण्याचे काम सुरु करण्यात आले. परंतु रुग्णांच्या नातेवाईंकाच्या चेह:यावरील चिंता मात्र अधिक वाढल्याचे दिसत होते. रुग्णालयाबाहेर रुग्णांचे नातेवाईक हिरमुसल्या सारखे बसून होते.
 
प्रशासनाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईंका केला आहे. कोरोनामध्ये लंग्जला इनफेक्शन त्रस होत असतो, परंतु असे असतांना येथील रुग्णालयात सुविधा नाहीत, रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या औषधे वेळेत दिले जात नसल्याचा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकांना केला आहे.
 
ज्या कंपन्याकडून ऑक्सीजनचा साठा घेतला जातो, त्यांच्याकडून प्रोडक्शन कमी निघाल्याने हा मुद्दा उपस्थित झाला आहे. परंतु रात्री २ ते ३ टन साठा मिळणार असून रविवारी सकाळ किंवा दुपार र्पयत ८ ते १० टन साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे चिंता असणार नाही. परंतु ऑक्सीजनचा साठा संपला नसून सध्या रात्रभर पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. परंतु सकाळ साठा उपलब्ध झाला नाही तर रुग्णांचे हाल नको या उद्देशानेच येथील रुग्णांना ग्लोबलमध्ये हलविण्यात आले.
(गणेश देशमुख - अतिरीक्त आयुक्त, ठामपा)

Web Title: Oxygen stock in Thane Municipal Corporation's Covid Center ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.