शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन परिस्थितीत अंबरनाथ पालिकेकडून ऑक्सिजनची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:39 IST

बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी ऑक्सिजनची गरज भासणार होती. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा ...

बदलापूर : बदलापूर नगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी ऑक्सिजनची गरज भासणार होती. मात्र ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला तत्काळ ऑक्सिजन पुरविणे शक्य नसल्याने बदलापूर पालिकेने अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. मानवतेचा दृष्टिकोन ठेवत अंबरनाथ नगरपालिकेने तत्काळ २५० लिटर क्षमतेचा सिलिंडर पाठवत रुग्णांवर ओढवणारे संकट क्षमविले.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गौरी हॉल येथे २५० बेडचे कोविड रुग्णालय उभारले असून हे सर्व बेड ऑक्सिजन बेड असून त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यासाठी पालिकेने एका कंत्राटदाराची नेमणूक केली असून, त्या कंत्राटदारामार्फत लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. गौरी हॉलसोबतच पालिकेने आता जान्हवी हॉलमध्येही कोविड रुग्णालय उभारले असून, त्याठिकाणीही ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. त्या बेडसाठी गौरी हॉलमध्ये असलेले ऑक्सिजन जान्हवी लॉन येथे पाठविल्याने गौरी हॉलमधील रुग्णांना शुक्रवारी सकाळनंतर ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता होती. ही शक्यता लक्षात घेऊन पालिकेने लागलीच कंत्राटदाराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितले. मात्र अन्न व औषध प्रशासनामार्फत जे नवीन आदेश देण्यात आले आहे त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक कंत्राटदाराला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे बदलापूर पालिकेला किती ऑक्सिजनची गरज आहे हे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाला कळविल्या शिवाय ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य नव्हते. त्यामुळे कंत्राटदाराची ही समस्या लक्षात घेत पालिकेने तत्काळ आवश्यक असलेल्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी केली. दरम्यान, गौरी हॉलमधील रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून सुरक्षेचा उपाय करीत अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातून २५० लिटर क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजनचा सिलिंडर मागविण्यात आला. अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात अतिरिक्त सिलिंडर असल्याने मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनीही मानवाचा दृष्टिकोन लक्षात घेत बदलापूर पालिकेला ही मदत केली.

कंत्राटदारामार्फत ऑक्सिजन येण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अंबरनाथ पालिकेकडून लिक्विड ऑक्सिजन मागविले होते. मात्र कंत्राटदाराकडून ऑक्सिजनचा पुरवठा आता सुरळीत झाला आहे.

- दीपक पुजारी, मुख्याधिकारी, बदलापूर