शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

लोकमतच्या रक्तदानाच्या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा: समीर चौगुले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:11 AM

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले. यावेळी ७७ दात्यांनी रक्तदान केले.

ठळक मुद्देठाण्यात वर्तकनगर येथे ७७ दात्यांचे रक्तदानस्तुत्य उपक्रम- सोनाली पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लोकमत वृत्तपत्र समुहाने स्व. जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीर राबविले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले.लोकमत, ठाणे शहर काँग्रेस आणि श्री अय्यपा भक्त सेवा संघम, वर्तकनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अय्यपा भक्त सेवा संघमच्या सभागृहात रविवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन अभिनेते समीर चौघुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,

कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळात राज्याला रक्ताचा प्रचंड तुटवडा असतांना अवघ्या पाच हजारांच्या रक्ताच्या बाटल्या शिल्लक होत्या. लोकमतने हा उपक्रम हाती घेतल्यानंतर ६० हजार रक्ताच्या बाटल्या संकलित झाल्या. ही निश्चितच चांगली बाब आहे. इतका उदंड प्रतिसाद लाभेल, असे आमच्यासारख्या कलाकारांनाही वाटले नव्हते. समाज सजग असल्याचे हे चांगले उदाहरण आहे. लोकमत राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे लोकमतशी आपले नाते आहे. आता ६० हजार बाटल्या संकलित झाले असले तरी अजूनही नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे चौगुले म्हणाले.यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवकविक्र ांत चव्हाण, महासचिव सचिन शिंदे, संजय दंडाळे, रवींद्र आंग्रे, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष हेमंत पाटील, सुखदेव घोलप, रवी कोळी, संदीप शिंदे, रेखा मिरजकर आणि वर्तकनगर ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे तसेच श्री अय्यपा भक्त सेवा संघमचे अध्यक्ष शशीधरण नायर, महासचिव बाबू कुटी, सुशिद्रन मेनन आणि चंद्रमोहन पिल्ले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.* लोकमत टीमचे अभिनंदन- सोनाली पाटीलकोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळातही लोकमतची टीम अहोरात्र मेहनत घेऊन रक्तदानाच्या उपक्रमासाठी झटत आहे. हे पुण्याचे काम आहे. लोकांनीही रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री सोनाली पाटील हिने यावेळी केली.* यांच्यासह ७७ दात्यांचे रक्तदान-वर्तकनगर श्री अय्यपा देवस्थानचे पुजारी मोहन चंद्रन, माजी नगरसेविका शीतल आहेर, मच्छींद्र दरेकर, प्रणव कर्डिले,श्रीकांत गाडेकर, प्रविण खैरालिया, अमन बरत्वाल आणि वैशाली भोसले आदी ७७ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी अभिनेते समीर चौगुले आणि अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते दात्यांना प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेBlood Bankरक्तपेढीMaharashtraमहाराष्ट्र