लोकमतच्या रक्तदानाच्या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा: समीर चौगुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 00:48 IST2021-07-26T00:11:02+5:302021-07-26T00:48:36+5:30
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले. यावेळी ७७ दात्यांनी रक्तदान केले.

स्तुत्य उपक्रम- सोनाली पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लोकमत वृत्तपत्र समुहाने स्व. जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबीर राबविले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या उपक्रमातून इतरांनीही बोध घ्यावा, रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी केले. तर हा स्तुत्य उपक्रम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली पाटील हिने रविवारी ठाण्यातील वर्तकनगर येथील रक्तदान शिबिरामध्ये केले.
लोकमत, ठाणे शहर काँग्रेस आणि श्री अय्यपा भक्त सेवा संघम, वर्तकनगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री अय्यपा भक्त सेवा संघमच्या सभागृहात रविवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन अभिनेते समीर चौघुले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,
यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक
विक्र ांत चव्हाण, महासचिव सचिन शिंदे, संजय दंडाळे, रवींद्र आंग्रे, काँग्रेस सेवा दल अध्यक्ष हेमंत पाटील, सुखदेव घोलप, रवी कोळी, संदीप शिंदे, रेखा मिरजकर आणि वर्तकनगर ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे तसेच श्री अय्यपा भक्त सेवा संघमचे अध्यक्ष शशीधरण नायर, महासचिव बाबू कुटी, सुशिद्रन मेनन आणि चंद्रमोहन पिल्ले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
* लोकमत टीमचे अभिनंदन- सोनाली पाटील
कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या काळातही लोकमतची टीम अहोरात्र मेहनत घेऊन रक्तदानाच्या उपक्रमासाठी झटत आहे. हे पुण्याचे काम आहे. लोकांनीही रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्री सोनाली पाटील हिने यावेळी केली.
* यांच्यासह ७७ दात्यांचे रक्तदान-
वर्तकनगर श्री अय्यपा देवस्थानचे पुजारी मोहन चंद्रन, माजी नगरसेविका शीतल आहेर, मच्छींद्र दरेकर, प्रणव कर्डिले,श्रीकांत गाडेकर, प्रविण खैरालिया, अमन बरत्वाल आणि वैशाली भोसले आदी ७७ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी अभिनेते समीर चौगुले आणि अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते दात्यांना प्रमाणपत्राचेही वितरण करण्यात आले.