शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हाच आयुक्तांचे डोळे उघडतील

By admin | Updated: November 14, 2016 04:03 IST

घरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण सुरूच आहे. यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच आयुक्तांचे डोळे उघडतील,

डोंबिवली : घरांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘बिल्वदल’वासीयांनी गुरुवारपासून छेडलेले बेमुदत उपोषण सुरूच आहे. यात एखाद्याचा बळी गेल्यानंतरच आयुक्तांचे डोळे उघडतील, अशी संतप्त भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे. पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात चार दिवसांपासून रहिवाशांचे उपोषण सुरू आहे. आयुक्त ई. रवींद्रन हे शनिवारी डोंबिवलीत सूतिकागृहाच्या दौऱ्यासाठी आले होते. त्या वेळी ते भेट देऊन चर्चा करतील, अशी रहिवाशांना अपेक्षा होती. परंतु, त्यांनी पाठ दाखवल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी शनिवारी सूतिकागृह व शास्त्रीनगर रुग्णालयांच्या दुरवस्थेची पाहणी केली. त्या वेळी त्यांच्यासोबत रवींद्रन आणि अतिरिक्त आयुक्त संजय घरत हेदेखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर खासदार व महापौरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी रवींद्रनही भेट देतील, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांना होती. परंतु, ते न फिरकले नाहीत.आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत आहे, तरीही आयुक्त याची दखल घेत नाहीत, हे निषेधार्ह आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच आयुक्तांचे डोळे उघडतील का, असा सवाल रहिवासी संजय मांजरेकर यांनी केला आहे. आयुक्तांनी ठोस निर्णय घेऊन घरे द्यावीत, असा पवित्रा आमचा कायम आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. केडीएमसीचे सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक महेश पाटील यांनीही शुक्रवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, रहिवाशांचे उपोषण कायम आहे. केडीएमसी व जागामालकाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)