घोडबंदर रोडवर अपघात, ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 11:17 IST2019-05-15T11:10:10+5:302019-05-15T11:17:20+5:30

ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ मुल्ला बाग येथे एका कारचा ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.

one dead in road accident at ghodbunder thane | घोडबंदर रोडवर अपघात, ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू

घोडबंदर रोडवर अपघात, ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे एकाचा मृत्यू

ठळक मुद्देठाण्यातील घोडबंदर रोडजवळ मुल्ला बाग येथे एका कारचा ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातात सचिन काकोडकर यांचा मृत्यू झाला आहे. 

ठाणे - ठाण्यातील घोडबंदर रोडजवळ मुल्ला बाग येथे एका कारचा ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून अपघात झाला आहे. बुधवारी (15 मे) सकाळी झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुल्ला बाग बस डेपोजवळ इगल कन्स्ट्रक्शनद्वारे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र या खड्ड्यात कार कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात सचिन काकोडकर यांचा मृत्यू झाला आहे. 

सचिन काकोडकर हे त्यांची मारूती सुझुकी अर्टीका गाडी निलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोडकडे सकाळी घेऊन जात होते. त्याचवेळी मुल्ला बाग बस डेपोजवळ ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्यांची गाडी पलटी झाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडी खड्ड्यातून बाहेर काढली तसेच सचिन यांना उपचारासाठी बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

Web Title: one dead in road accident at ghodbunder thane