पैसे व साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:54+5:302021-06-22T04:26:54+5:30

मीरा रोड : एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेस बोल बच्चन टोळीच्या दोघा भामट्यांनी पैसे व साडीचे आमिष दाखवून सोन्याच्या ...

The old man was robbed by showing the lure of money and sari | पैसे व साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले

पैसे व साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले

मीरा रोड : एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेस बोल बच्चन टोळीच्या दोघा भामट्यांनी पैसे व साडीचे आमिष दाखवून सोन्याच्या चार तोळ्याच्या बांगड्या आणि पाचशे रुपये रोख लुटून नेले.

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील साई कॉम्प्लेक्समध्ये राहणारी नीता शिंदे ही वृद्ध महिला शनिवारी भाजी खरेदी करून परत घरी जात होती. त्यावेळी दवाखाना कुठे असे विचारत दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना बोलण्यात गुंतवले. एकाने सांगितले की, पंजाबी व्यक्तीस १० मुलींनंतर मुलगा झाला आहे. त्यामुळे तो साड्या व पैसे वाटणार आहे. तुम्ही हातातील बांगड्या काढून पर्समध्ये ठेवून द्या, असे म्हणत हातचलाखीने सोन्याच्या २ बांगड्या व पर्समधील ५०० रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले. काशिमीरा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The old man was robbed by showing the lure of money and sari